‘लसींचा पुरवठा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर राज्यांच्या लसीकरणातील कामगिरीच्या आधारावर’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

‘लसींचा पुरवठा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर राज्यांच्या लसीकरणातील कामगिरीच्या आधारावर’

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असून काही ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यातच, केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत दुजाभाव करत असल्याचं आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं. पुढील २ ते ३ दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा असल्याचंही त्यांनी काल सांगितलं होतं. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

देवेंद्र फडणवीस पहिल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “केवळ तीन राज्यांनाच 1 कोटीपेक्षा अधिक लस प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान. यात गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या समान. (राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार) लसींचा पुरवठा हा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर त्या-त्या राज्यांच्या लसिकरणातील कामगिरीच्या आधारावर! महाराष्ट्राला 1.06 कोटी लस प्राप्त झाल्या. तसे ट्विट डीजीआयपीआरने 26 एप्रिल रोजी केले आहे. 91 लाख लसी वापरल्या. म्हणजे 15 लाख लस शिल्लक आहेत. मग, आज जाणिवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय?”


“आज ज्या राज्यांना कोटा दिला आहे, तितक्या लसी पुरवठ्याच्या मार्गात (पाईपलाईनमध्ये) आहेत, तो पुरवठा 9 ते 12 एप्रिल या काळात होईल. यात महाराष्ट्राला पुन्हा अधिकच्या 19 लाख लस मिळणार आहेत. उत्तर प्रदेश हे सर्वांत मोठे राज्य आहे. त्यांना 92 लाख लसींचे डोज मिळाले आहेत. त्यांनी 83 लाख डोज वापरले आहेत आणि 9लाख लसींच्या मात्रा त्यांच्याकडे शिल्लक आहेत. हरयाणाला पहिल्या पाईपलाईनमध्ये फारसे डोज मिळाले नव्हते. त्यांना आता डोज प्राप्त होत आहेत”, असंही फडणवीसांनी म्हटलंय.


शरद पवारांनी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली

“शरद पवारजी यांनी डॉ. हर्षवर्धनजी यांच्याशी चर्चा केली. त्यांना संपूर्ण वस्तुस्थिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अवगत करत आश्वस्त केले. मी स्वत:ही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी आश्वस्त केले,महाराष्ट्राशी भेदभाव होणार नाही आणि कामगिरीच्या आधारावर तत्काळ पुरवठा होईल. कोरोनाविरोधातील लढाईत पहिल्या दिवसापासून केंद्र सरकारने सर्व राज्यांना सोबत घेऊन ही लढाई लढली आहे आणि महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली आहे. आजही केंद्र सरकार महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा लावून सर्व ती मदत करते आहे”, असा दावाही फडणवीसांनी केलाय.

लसीचं राजकारण करु नका, फडणवीसांचं आवाहन

“व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाही, रेमडेसिवीर उपलब्ध नाही, ऑक्सिजन उपलब्ध नाही, साधे बेड उपलब्ध नाही! मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही. लस येत आहेत, येत राहतील. पण, प्राथमिक सेवाही देता येत नसताना भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. याकडे मुख्यमंत्री आणि मंत्री लक्ष देणार का?” असा प्रश्न विचारतानाच “राज्यातील कोरोना आणि लसीकरण हे महत्त्वाचे प्रश्न आहेतच. परंतू त्यासोबतच सरकारच्या गैरकारभारावर होत असलेली टीका आणि विविध प्रकरणात न्यायालयात निघत असलेले वाभाडे यावरून लक्ष विचलित करण्यासाठी व्हॅक्सिनवर राजकारण कृपया करू नये, ही कळकळीची विनंती आहे”, असा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

राज्यातील कोरोना आणि लसीकरण हे महत्त्वाचे प्रश्न आहेतच. परंतू त्यासोबतच सरकारच्या गैरकारभारावर होत असलेली टीका आणि विविध प्रकरणात न्यायालयात निघत असलेले वाभाडे यावरून लक्ष विचलित करण्यासाठी व्हॅक्सिनवर राजकारण कृपया करू नये, ही कळकळीची विनंती आहे, असंही फडणवीस म्हणाले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

‘लसींचा पुरवठा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर राज्यांच्या लसीकरणातील कामगिरीच्या आधारावर’

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असून काही ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यातच, केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत दुजाभाव करत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, सीबीआय चौकशीविरोधातील याचिका फेटाळल्या

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. याविरोधात अनिल देशमुख आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यात पुन्हा लोकल प्रवासावर निर्बंध येण्याची शक्यता, वडेट्टीवारांची माहिती

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतेय. त्यात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर दिवसाला १० हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

महाविकास आघाडी नसून महावसुली आघाडी, यांच्यामुळे महाराष्ट्राच्या अब्रुची लक्तरं निघाली- प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली – “गेल्या ३० दिवसांमध्ये महाराष्ट्रात अशा उलथापालथी होत आहेत, रोज इतके नवनवे खुलासे होत आहेत की त्यांचा ट्रॅक ठेवणं देखील कठीण जात आहे....
Read More
post-image
आरोग्य जीवनशैली

Work from home करताना आरोग्याच्या समस्या वाढल्या? मग ‘या’ टिप्स नक्की वाचा

मुंबई – गेल्या वर्षभरापासून सुरु असलेला कोरोनाव्हायरस संसर्गासोबतची लढाई आजही सुरुच आहे. आता भारतात दुसरी लाट आली पुन्हा एकदा संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. या...
Read More