Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले? – eNavakal
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य, बँकींग, स्पर्धा परीक्षा, उत्पादन क्षेत्र, अशा विविध क्षेत्रात बरेच बदल करण्यात आले आहेत. हे सगळे निर्णय तुम्हाला एकाच ठिकाणी वाचायला मिळतील.

कृषी क्षेत्र

 • २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न्न दुप्पट होईल
 • शेतकऱ्यांसाठी १५ लाख कोटी कर्जाची तरतूद
 • झिरो बजेट शेतीवर सरकारचा भर
 • शेतकरी महिलांसाठी विशेष योजना राबवणार
 • शेतकऱ्यांसाठी ऑरगॅनिक मार्केट उभारणार
 • शेती पंपांना सौर उर्जेवर जोडण्यासाठी प्रयत्न
 • २० लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा  संयंत्र दिले जाईल
 • मत्स्यपालनाचा विस्तार करण्यासाठी 500 मत्स्य उत्पादक संस्था तयार करणार
 • ग्रामीण भागातील युवकांसाठी सागर मित्र योजना राबवणार
 • सेंद्रिय शेतीवर भर देणार
 • 2025 पर्यंत दुग्ध उत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष्य
 • जलजीवन मिशनसाठी 3.6 लाख कोटींची तरतूद
 • कृषी सामानासाठी विमानसेवा, नाशवंत मालासाठी कृषी उडाण योजना
 • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मार्गावर योजना सुरु करणार

आरोग्य

 • २०२५ पर्यंत टीबीमुक्त भारत करणार
 • टीबी हारेगा देश जितेगा मिशन राबवणार
 • वैद्यकीय महाविद्यालय बनवण्यासाठी केंद्र सरकार संस्थांना मदत करणार
 • १२ आजारांसाठी मिशन इंद्रधनुष्य राबवणार
 • आयुष्यमान योजनेत २०० रुग्णालये जोडली जाणार
 • सर्व जिल्ह्यांत स्वस्त आरोग्य केंद्र उभारणार

शैक्षणिक क्षेत्र

 • शिक्षणात FDI ची गुंतवणूक करणार
 • शिक्षणासाठी ९९ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद
 • स्किल इंडियासाठी ३ हजार कोटींची तरतूद
 • नव्या अभियंत्यांना १ वर्षाची इंटर्नशिप देणार
 • ३ हजार कौशल्य विकास केंद्र उभारणार
 • आफ्रिका आणि आशियातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर करणार
 • शैक्षणिक धोरणांत राज्ये आणि खासदारांचा समावेश करणार
 • शैक्षणित धोरणांसाठी २ लाख सुचना आल्या.
 • नॅशनल फॉरेन्सिक विद्यापीठ स्थापन करणार
 • राष्ट्रीय न्याय वैद्यक विद्यापीठ स्थापणार
 • नव्या सरस्वती सिंधू विद्यापीठाची घोषणा
 • भारतीय तरुणांनाही परदेशी शिक्षण सुलभ करणार
 • राष्ट्रीय पोलीस विद्यापीठाचा प्रस्ताव
 • स्टार्टअपसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मभारत नेटसाठी ६ हजार कोटीची तरतूद

वाहतूक क्षेत्र

 • वाहतूक क्षेत्रात 1.70 लाख कोटी गुंतवणूक करणार
 • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प गतीमान होणार
 • मॉडर्न रेल्वे स्टेशन, विमानतळ, बसस्थानके, लॉजिस्टिक सेंटर उभारणार
 • इंफ्रास्ट्रक्चर कंपन्यांच्या स्टार्टअपमध्ये तरुणांना संधी देण्याचं आवाहन
 • 2024 पर्यंत देशात नवे 100 विमानतळं उभारणार
 • तेजस सारख्या ट्रेनची संख्या वाढवणार, तेजस ट्रेन पर्यटन स्थळांना जोडणार
 • जलवाहतुकीला चालना देणार, हा मार्ग आसामपर्यंत वाढवणार
 • रेल्वेमध्ये खासगी सहभाग वाढवणार
 • २७००० किमी रेल्वेमार्ग इलेक्ट्रिक करणार
 • आणखी ५५० रेल्वे स्थानकांवर वायफाय देणार
 • चेन्नई-बंगळुरूदरम्यान नवा रेल्वे मार्ग

बँकिंग क्षेत्र

 • सरकार बँकांसाठी ३.५० लाख कोटी रुपयांची तरतूद
 • टॅक्स पेयर चार्टर आणणार
 • CAT परीक्षा संगणकाद्वारे घेणार
 • कंपनी कायद्यामध्ये दुरुस्ती करणार
 • पर्सनल बँकिंगची सुरक्षा वाढवली
 • सर्व शेड्यूल व्यवसायिक बँकांमधील ठेवीदारांचे पैसे सुरक्षित
 • IDBI बँकेतील सरकारी भागीदारी विकणार
 • PSU बँकांतील जागा लवकरच भरणार
 • सरकारी बँकांना बाजारातून भांडवल जमवण्यास मंजुरी
 • सहकारी बँकांना आणखी अधिकार देणार
 • MSME कर्ज पुनर्गठण योजना 1 वर्ष आणखी वाढवणार
 • १० बँकांचे ४ बँकात विलिनीकरण होणार

उत्पादन क्षेत्र

 • पुढील पाच वर्षांत 100 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य
 • वस्त्रोद्योगासाठी चार वर्षांत १४८० कोटींची तरतूद
 • प्रत्येक जिल्ह्यात एक्स्पोर्ट हब तयार करण्यासाठी योजना
 • 5 नवीन स्मार्ट शहरे तयार करणार
 • गुंतवणूक सुलभीकरणावर देणार भर
 • गुंतवणूक कक्षाची स्थापना करणार
 • इलेक्ट्रॉनिक उत्पादन उद्योगासाठी नवीन योजना आणणार
 • मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीला प्रोत्साहन देणार
 • निर्विक योजने अंतर्गत कर्जवाटप

प्रदूषण रोखण्यासाठी

 • शहरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी ४४०० कोटींची तरतूद
 • अतिरिक्त प्रदूषण करणारे औष्णिक विद्यूत केंद्र बंद करणार
 • कार्बन सोडणारे थर्मल प्लांट बंद होणार

महिला सक्षमीकरण

 • महिला विकासाठी २८ हजार ६०० कोटी रुपयांची तरतूद
 • बेटी  बचाव, बेटी पढाव या योजनेला चांगला प्रतिसाद
 • शाळेत जाणाऱ्या मुलींची  संख्या वाढवली
 • मुलांपेक्षा मुलींचे शिक्षणात प्रमाण वाढले
 • महिलांच्या आरोग्यात मोठी सुधारणा
 • पोषक आहार योजनांसाठी ३५ हजार ६०० कोटी रुपयांची तरतूद
 • अंगणवाडी कर्मचारी स्मार्टफोनने जोडले गेले
 • आधी मुलींच्या लग्नाचे वय वाढवले, आता मुलींच्या आई होण्याच्या वयोमर्यादेवरही सरकार विचाराधीन

पर्यटन

 • रांचीमध्ये आदिवासी संग्रहालय स्थापन करणार
 • राष्ट्रीय संस्कृती विद्यापीठास ३१५० कोटी
 • अहमदाबादमध्ये समुद्री संग्रहालय उभारणार
 • ५ पुरातत्व विभाग विकसित करणार
 • पर्यटन विभागासाठी २५०० कोटी रुपयांची तरतूद

GDP 

 • २०२०-२१ पर्यंत १० टक्के आर्थिक विकासदाराचे लक्ष्य गाठणार प्रयत्न सरकारकडून केले जाणार आहेत.
 • वित्तीय तूट ३.८ टक्के राहणार

आयकर 

 • ५ ते ७.५ लाख उत्पनावर १० टक्के टॅक्स,
 • ७.५ ते १० लाख उत्पनावर १५ टक्के टॅक्स
 • १० ते १२.५ लाख उत्पनावर २० टक्के
 • १२.५ ते १५ लाख उत्पनावर २५ टक्के
 • १५ लाख उत्पनाच्या पुढे ३० टक्के
 • नव्या कॉर्पोरेट कंपन्यांसाठी १५ टक्के टॅक्स

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More