वादविवादाचे प्रसंग टाळावेत. गैरसमजुतीचे घोटाळे होऊ शकतात.
आपमतलबी लोकांपासून सावध राहा. प्रसिद्धीच्या मागे लागू नका.
सद्विवेकबुद्धी जागृत ठेवा. काही वेळा योग्य निर्णय घेणे अवघड जाईल.
सर्व बाबतीत आघाडीवर राहाल. आत्मविश्वास जागृत ठेवावा लागेल.
व्यावसायिक निर्णय गुप्त ठेवा, उसनवारीत कोणालाही जामीन राहू नका.
विरोधकांचे डावपेच उधळून लावाल. अधिकाराच्या कक्षा रुंदावतील.
आत्मविश्वास, हुरूप, उत्साह वाढेल. आर्थिक लाभाचे संकेत मिळतील.
काही प्रश्नात अलिप्त राहाणे शहाणपणाचे ठरेल. वाहनसुखाचा अनुभव मिळेल.
जवळचे लोक तुमच्या कार्यात अडथळे निर्माण करतील. अति साहस टाळणे योग्य.
अधिक व्यावहारिक होणे महत्वाचे. घरात उत्साह वाढविणा-या गोष्टी घडतील.
मित्रांनी दिलेली आश्वासने फसवी ठरतील. कार्यक्षेत्रात कसोटीचे प्रसंग येतील.
नव्या कामात घातलेला हात यश देईल. नोकरी व्यवसायात आपला दबदबा वाढेल.