‘घाईघाईत लस बनवली जातेय, मी घेणार नाही,’ राजीव बजाज यांचं मोठं वक्तव्य – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

‘घाईघाईत लस बनवली जातेय, मी घेणार नाही,’ राजीव बजाज यांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली – कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.  त्यातच, प्रसिद्ध उद्योजक राजीव बजाज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. १०० टक्के अनिवार्य होत नाही तोवर मी कोरोनाची लस घेणार नाही, असं ते म्हणाले. ईटी नाऊला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

या मुलाखतीत ते म्हणाले की, “१०० टक्के अनिवार्य होईपर्यंत मी करोनाची लस घेणार नाही. ही नवी लस आहे आणि घाईघाईत ती तयार केली जात आहे. ती सर्वात अखेरची गोष्ट असेल जी मी घेईन,” असं बजाज म्हणाले. होमियोपॅथी. योग आणि सोशल डिस्टन्सिंगवर आपला सर्वाधिक विश्वास आहे आणि त्याचं पालन आपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी देशातील तरूण आणि उत्तम आरोग्य असलेल्या नागरिकांना कोरोनाची भीती घालवण्याचं आवाहन केलं.

ते पुढे म्हणाले की, “निरनिराळ्या जागी आणि ठिकाणी लॉकडाउन करण्याऐवजी सरकारनं २० ते ६० वर्षांमधील तंदुरूस्त असलेल्या लोकांना सामान्य पद्धतीनं आपलं कामकाज करू द्यावं.’ यापूर्वी त्यांनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेलं लॉकडाउन हे कठोर असल्याचं म्हटलं होतं. भारतानं पश्चिमेकडील देशांचं अनुकरण करत देशात लॉकडाउन लागू करण्याचा प्रयत्न केला. असं असलं तरी कोरोनाचा प्रसार मात्र थांबला नाही आणि देशाचा जीडीपीही खाली आला. याव्यतिरिक्त देशाच्या अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फटका बसल्याचं ते काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान म्हणाले होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप, भरारी पथके नेमण्याचे आदेश

मुंबई – राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत २३९  नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज २३९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ३२७  जणांना गेल्या २४...
Read More
post-image
मुंबई

९८ वर्षांच्या आजोबांनी १९ दिवसांत केली कोरोनावर मात

मुंबई – देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आहेत. देशात ६० वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे कोरोनामुळे सर्वाधिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी मुंबई पालिकेची नवी नियमावली, घरातच सक्तीने राहावं लागणार क्वारंटाइन

मुंबई – देशातील विविध राज्यातून मुंबईत परप्रांतीयांचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळे मुंबई पालिकेने बाहेरून येणाऱ्यांसाठी नवे नियम तयार केले आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना...
Read More
post-image
मनोरंजन

ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कागदपत्रे घेऊन पुन्हा कार्यालयात दाखल

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे. ईडीच्या चार अधिकाऱ्यांकडून गेल्या काही तासांपासून रियाची चौकशी सुरु आहे. ईडी कार्यालयात...
Read More