#PulwamaAttack जावेद अख्तर, शबाना आझमी देशद्रोही – कंगना राणावत – eNavakal
आघाडीच्या बातम्या

#PulwamaAttack जावेद अख्तर, शबाना आझमी देशद्रोही – कंगना राणावत

मुंबई – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. देशात ठिकठिकाणी या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जाणारी अभिनेत्री कंगना राणावतने या हल्ल्यावर बोलताना कंगनाने जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्यावर निशाणा साधत ते दोघे देशद्रोही असल्याचं म्हटलं आहे.

एका मुलाखती दरम्यान ती म्हणाली, जावेद अख्तर आणि शबाना आझमी पाकिस्तानशी संस्कृतीचं अदान-प्रदान करतात. हे तेच लोक आहेत जे ‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणाऱ्यांचं समर्थन करतात. फिल्म इंडस्ट्री देशद्रोही लोकांनी भरली आहे. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती. तरी शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांना पाकिस्तानमध्ये कार्यक्रम घेण्याची गरज का वाटली? असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे. आपल्याला पाकिस्तानच्या बंदीवर नाही तर त्याच्या विनाशावर फोकस करायला हवं, असेही कंगनाने यावेळी म्हटले. यासह कंगनाने नवज्योत सिंग सिद्धू यांचं नाव न घेता हल्ल्यानंतर शांततेत मार्ग काढा अशी मागणी करणाऱ्यांना खडे बोल सुनावले. आता जो शांततेबद्दल बोलेल त्याला रस्त्यावर आडवून कानाखाली मारा असे वक्तव्य कंगनाने केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More