‘अर्थव्यस्थेला गती देण्याकरता खासगी क्षेत्रांनीही योगदान द्यावं’, शक्तिकांत दास यांचे आवाहन – eNavakal
News आघाडीच्या बातम्या देश

‘अर्थव्यस्थेला गती देण्याकरता खासगी क्षेत्रांनीही योगदान द्यावं’, शक्तिकांत दास यांचे आवाहन

नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे देशाचं अर्थचक्र बिघडलं आहे. त्यामुळे आता अनलॉकच्या प्रक्रियेत देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोणतीही पावलं उचलण्यासाठी तयार असल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं. तसंच, अर्थव्यस्थेला गती देण्याकरता खासगी क्षेत्रांनीही योगदान द्यावं असं ते म्हणाले. उद्योग संघटना फिक्कीनं बुधवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

लॉकडाऊनमुळे रोजगार ठप्प झाले, व्यवसाय बंद पडले. परिणामी अर्थव्यवस्थेचं चाक खोलात रुतलं गेलं. परिणामी भारताचा जीडीपी -२३ च्याही खाली गेला. यावर बोलताना शक्तीकांत दास म्हणाले की,  “कोरोनानंतर आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी खासगी क्षेत्रांना रिसर्च आणि इनोव्हेशन, अन्न प्रक्रिया आणि पर्यटन क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावण्याची आवश्यकता आहे. पर्यटन क्षेत्रात अनेक व्यापक संधी उपलब्ध आहेत आणि खासगी क्षेत्रांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे,” असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी देशातील नव्या शैक्षणिक धोरणावरही भाष्य केलं. शिक्षण कायमच आर्थिक विकासात आपलं योगदान देतं. त्यामुळे नवं शैक्षणिक धोरण हे ऐतिहासिक आहे आणि नव्या सुधारणांसाठी ते आवश्यकही असल्याचं दास म्हणाले. पर्यटन क्षेत्रा देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचं इंजिन ठरू शकतं. येणाऱ्या काळात याच्या मागणीत वाढ होण्य़ाची शक्यता आहे. अशातच या क्षेत्राला कॅपिटलाईझ करण्याची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त लोन रिस्टक्चरिंग स्किम तयार करताना लोकांच्या हितांचं आणि त्यांच्या आर्थिक स्थिरतेचा विचार होणं महत्त्वाचं आहे. सुरू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कृषी, उत्पादन या क्षेत्रांमध्ये वाढ होताना दिसत आहे आणि पुढील काळात ती वेगानंही वाढेल. याव्यकतिरिक्त बेरोजगारीही हळूहळू कमी होण्याची शक्यता असून काही क्षेत्रात ती त्या घटही झाल्याचं दास यांनी नमूद केलं.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘अंनिस’च्या हस्तक्षेप याचिकेवर इंदोरीकर महाराजांचा आक्षेप

शिर्डी – कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने हस्तक्षेप याचिका सादर केली होती. त्यावर इंदोरीकर महारांच्या वकिलांनी आक्षेप घेतला...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

मुंबईच्या महापौरांना भाजपच्या ६५ नगरसेविकांच्या स्वाक्षरीचं पत्र धाडलं

मुंबई – कोविड सेंटरच्या उभारणीचं कंत्राट मुलाला देणं, कंगना रानौतचं कार्यालय पाडणं आदी विषयांमुळे चर्चेत असलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोविड योद्धेच कोरोनासंक्रमणात, गेल्या २४ तासांत २४७ पोलिसांनी लागण

मुंबई – कोरोनाविरोधात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात २४७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलंय....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

‘अर्थव्यस्थेला गती देण्याकरता खासगी क्षेत्रांनीही योगदान द्यावं’, शक्तिकांत दास यांचे आवाहन

नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे देशाचं अर्थचक्र बिघडलं आहे. त्यामुळे आता अनलॉकच्या प्रक्रियेत देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी रिझर्व्ह बँक...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोरोनामुक्त झाल्यावर होम क्वारंटाइन असलेल्या इसमाने केली आत्महत्या

पुणे – एकीकडे पुण्यात कोरोनाचा हाहाकार वाढत असतानाच रुग्णांमध्ये नैराश्येचं प्रमाणही वाढत आहे. कोरोनामुक्त झालेल्या एका इसमाने नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली...
Read More