Corona: खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा आता सरकारच्या ताब्यात – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा आता सरकारच्या ताब्यात

मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस  वाढत असल्याने रुग्णालयांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यातच अशा परिस्थितीत खासगी रुग्णालयांकडून सहकार्य मिळत नसल्याने धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. आरोग्य व्यवस्थेवर ताण येत असल्याने खासगी रुग्णालयांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र अनेक खासगी रुग्णालयांनी आपले दर अवाच्या सव्वा वाढवल्याने सामान्य नागरिकांना उपचार परवेनासे झाले आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडे आल्याने त्यांनी याची गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याची गंभीर दखल घेत खासगी रुग्णालयांच्या या मनमानीला चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या ३१ ऑगस्टपर्यंत खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा सरकारच्या ताब्यात राहणार आहेत.

खासगी रुग्णालये सरकारी नियंत्रणाखाली घेण्याबरोबरच या रुग्णालयांना अत्यावश्यक सेवा कायदाही (मेस्माही) लागू केला जाणार आहे. परिणामी खासगी रुग्णालयांतील डॉक्टर्स, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांना सेवा बजावणं बंधनकारक राहणार आहे, अशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी दिली.

खासगी रुग्णालयांसाठी आपत्ती निवारण कायदाही सरकारनं लागू केला आहे. त्यामुळं सरकारचा आदेश न मानणाऱ्या खासगी रुग्णालयांवर अजामीन पात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, अशीही माहिती शिंदे यांनी दिली.

वैद्यकीय उपचारांवरील खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारनं शुल्क आकारणीवरही मर्यादा घातली आहे. त्यानुसार यापुढं एका दिवसासाठी जास्तीत जास्त ४ हजार, ७.५ हजार व ९ हजार रुपये अशा पद्धतीनं दर आकारता येणार आहे. आरोग्य विमा कंपन्यांनी ठरविलेल्या दरांनुसार हे दर निश्चित करण्यात आल्याचं नव्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More