कोरोना चाचणीचे दर आणखी कमी केले, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कोरोना चाचणीचे दर आणखी कमी केले, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई -राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १९००, २२०० आणि २५०० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

वाचा – वाढीव वीजबिलाबाबत पुण्यात गांधीगिरी, महावितरण अधिकार्‍यास शिवसेनेकडून 7 हजारांची चिल्लर

राज्य शासनाने समिती नेमून काही दिवसांपूर्वी कोरोना चाचण्यांचे दर निश्चित केले होते. रुग्णालयातून रुग्णाचा स्वॅब घेतला त्यासाठी २२०० रुपये दर आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेऊन तपासणी केली तर त्यासाठी २५०० रुपये आकारायचा निर्णय झाला होता. काही व्यक्ती, रुग्ण स्वत: थेट प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करतात त्यांच्याकडून २८०० रुपये आकारले जात होते. अशा वेळी त्यांच्याकडून २८०० रुपयांऐवजी २५०० रुपये आकारावेत असे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले.

मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळे चाचण्यांसाठी लागणारे रिएजंटस्, व्हीटीएम कीट व पीपीई किट यांची उपलब्धता वाढल्याने त्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे तपासणी खर्चात कपात होणे आवश्यक होते. याबाबी लक्षात घेऊन प्रयोगशाळा व किटस् उत्पादकांशी चर्चा करून समितीने शिफारशींसह आपला अहवाल शासनला सादर केला. त्यानुसार चाचण्यांचे पुन्हा सुधारित दर निश्चित करण्यात आले.

त्यामुळे आता सॅम्पल घेऊन त्याची वाहतूक आणि सॅम्पलचे रिपोर्टींग त्याकरिता २२०० रुपयांऐवजी १९०० रुपये आकारण्यात येईल. तर स्वॅब कलेक्शन सेंटर, कोरोना केअर सेंटर्स, क्वारंटाईन सेंटरमधील येथून स्वॅब घेतल्यास २५०० रुपयांऐवजी २२०० आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २५०० रुपये सुधारीत दरानुसार आकारण्यात येणार आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

वयाच्या ७९ व्या वर्षी राज्यपालांनी किल्ले शिवनेरी केला सर

पुणे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

भारतीय क्रिकेटचा गौरवशाली अध्याय संपला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई – माजी क्रिकेटपटू, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू चेतन चौहान यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे, महान खेळाडू सुनील गावस्कर यांच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत  ३२० नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३२० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून ३४१ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३२० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण

मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादु्र्भाव वाढत असताना अनेक नेत्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. आता माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनाही कोरोनाची लागण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज नव्या ११ हजार १११ रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे...
Read More