फेक फॉलोअर्सप्रकरणी बॉलिवूडकर कचाट्यात? गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश – eNavakal
ट्रेंडिंग तंत्रज्ञान मनोरंजन

फेक फॉलोअर्सप्रकरणी बॉलिवूडकर कचाट्यात? गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई – खोट्या फॉलोअर्सची बाब समोर आल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर गंडांतर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणी अनेक कलाकारांची चौकशी होणार असून खोटे फॉलोअर्स पुरवणाऱ्या एजन्सीविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी अनेक एजन्सी काम करत आहेत. अशाच  खोट्या फॉलोअर्सवर मुंबई पोलिसांची नजर पडली असून सोशल मिडियावर खोट्या फॉलोअर्ससंदर्भातील तपास पोलिसांनी सुरु केला आहे. यासंदर्भातील बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आल्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याच प्रकरणी महत्वाची माहिती दिली आहे. खोट्या फॉलोअर्स प्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

“अशा काही पीआर एजन्सी आहेत ज्या खोटे फॉलोअर्स पुरवतात. अगदी बॉलिवूडमधील कलाकारांनाही खोटे फॉलोअर्स पुरवले जातात. हे फॉलोअर्स केवळ लोकप्रियता वाढवण्यासाठी वापरले जात नाहीत तर ते ट्रोलिंग आणि एकाद्याची माहिती चोरण्यासाठीही वापरले जातात. त्यामुळेच राज्याचं पोलीस खातं या प्रकरणाची चौकशी करणार आहे,” असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात ट्विट केलं आहे.

काय आहे प्रकरण?

फेक फॉलोअर्सला इन्स्टाग्रामच्या भाषेत ‘बोट्स’ असं म्हटलं जातं. याच ‘बोट्स’च्या मदतीने अनेक कलाकार आणि प्रभावशाली व्यक्ती आपल्या फॉलोअर्सची संख्या फुगवून दाखवतात. हे बोट्स विकत घेतलेले असतात. म्हणजेच पैसे देऊन फॉलोअर्सची संख्या वाढवता येते. ही माहिती समोर आल्यानंतर आता या चौकशीचा भाग म्हणून मुंबई पोलीस लवकरच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणबरोबरच इतर सेलिब्रिटींची चौकशी करणार असल्याचे वृत्त डीएनए या वेबसाईटने काही दिवसांपूर्वीच दिलं आहे. येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये मुंबई पोलिसांचे विशेष पथक या अभिनेत्रींबरोबरच इतर सेलिब्रिटींची चौकशी करणार असल्याचे या वृत्तामध्ये म्हटलं आहे. खोट्या फॉलोअर्ससंदर्भातील या तपासादरम्यान दीडशे लोकांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी फेक फॉलोअर्स असणाऱ्या व्यक्तींची यादीच तयार केली आहे. या यादीमध्ये बॉलिवूडमधील सेलिब्रिटींबरोबरच अनेक खेळाडू, बिल्डर आणि हाय प्रोफाइल व्यक्तींची नावं असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई पोलीस या चौकशीदरम्यान सेलिब्रिटींकडे त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येसंदर्भात प्रश्न विचारु शकतात. सर्व फॉलोअर्स हे खरे असून फॉलोअर्सचा आकडा फुगवून सांगण्यासाठी कोणत्याही कंपनीची किंवा चुकीच्या पद्धतीचा वापर केला नाही हे सेलिब्रिटींना पोलिसांना पटवून द्यावे लागणार आहे. या फेक फॉलोअर प्रकरणात आतापर्यंत १८ लोकांची चौकशी झाली आहे. पोलिसांनी या व्यक्तींची चौकशी केली आहे ते सर्वजण हे छोट्या पडद्याशी म्हणजेच मालिका आणि टीव्हीवरील मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहेत. यामध्ये कलाकारांबरोबरच निर्माते, निर्देशक, मेकअप आर्टीस्ट, कोरियोग्राफर आणि सहाय्यक दिग्दर्शकांचा समावेश आहे. फेक फॉलोअर्स संदंर्भात भारतामध्ये अशाप्रकारे पहिल्यांदाच चौकशी केली जात आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला २३ हजारांचा टप्पा, आज ३६८ नव्या रुग्णांची नोंद

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी २३ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज ३६८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून २३२ जणांना गेल्या २४...
Read More
post-image
मनोरंजन

करिना पुन्हा आई बनणार, गुड न्यूजच्या बातमीवर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

मुंबई – अभिनेत्री करीना कपूर पुन्हा आई बनणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. तसेच, या गुड न्यूज बाबत खुद्द सैफ आणि करिनाने सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, निलेश राणेंची मागणी

मुंबई – सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्यात आल्याने निलेश राणे आणखी सक्रीय झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदम्यान आदित्य...
Read More
post-image
मुंबई

मुंबई पालिकेच्या अभय योजनेची मुदत वाढवली

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईकरांना या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कोरोना चाचणीचे दर आणखी कमी केले, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई -राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या...
Read More