२० लाख कोटींचं पॅकेज म्हणजे देशाची क्रूर चेष्टाच- सोनिया गांधी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

२० लाख कोटींचं पॅकेज म्हणजे देशाची क्रूर चेष्टाच- सोनिया गांधी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थचक्र सुरळीत होण्याकरता आणि सामान्यांसाठी २० लाख कोटींची घोषणा केली. हे २० लाखांचं कुठे खर्ची करणार याची माहिती देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ५ दिवस घेतले. मात्र हे पॅॅकेज म्हणजे देशाची क्रूर चेष्टाच आहे, असं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी म्हटलंय. आज देशातील २२ विरोधी पक्षांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. त्यावेळी केंद्र सरकारच्या उपाययोजनेवर सोनिया गांधींनी ताशेरे ओढले आहेत.

या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसह अनेक २२ पक्ष होते. मात्र, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टीने या बैठकीत सहभाग घेतला नव्हता.


अम्फान चक्रीवादळात मृत पावलेल्या लोकांसाठी या बैठकीत आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या की, देशातील लॉकडाऊनबाबत सरकारमध्ये संभ्रम आहे. तसेच, लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी दुसऱ्या उपाययोजनाही आखण्यात येत नाहीयत. संकटाच्या या काळात पंतप्रधानांच्या कार्यालयातच संपूर्ण शक्ती आहे, तिथूनच देश नियंत्रित केला जात असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली.

वाचा – Corona: खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा आता सरकारच्या ताब्यात

२१ दिवसांत कोरोनावर मात करू असा केंद्र सरकारने केलेला दावा फोल ठरला आहे. त्यामुळे आता लस सापडत नाही तोवर कोरोनावर मात करता येणं अशक्य आहे, असं दिसतंय. माझ्या मते सरकार लॉकडाऊनबाबतीतील नियमांबाबत अद्यापही निश्चित नाही.

वाचा – पाकिस्तानात 99 प्रवासी असलेले विमान कोसळले, निवासी भागात धुरांचे लोळ

गरजू, गरीब लोकांच्या खात्यात पैसे टाकावे, सर्वांना मोफत रेशन दिले पाहिजे, घरी परतणाऱ्या स्थलांतरीत मजुरांना ट्रेन, बसची सुविधा केली जावी अशा मागण्या विविध पक्षांनी सरकारकडे केली होती. शिवाय, लॉकडाऊनमुळे अनेकांचा पगार थकला आहे, अशा कर्मचाऱ्यांसाठी वेतन सहायता कोष तयार केला जावा, अशीही मागणी केली होती. मात्र आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका त्यांनी केली.

वाचा – Cyclone Amphan: प. बंगालसाठी १ हजार कोटी, मृतांच्या नातेवाईकांना २ लाख देणार

बैठकीत कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौड़ा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, सीताराम येचुरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेता शरद पवार, द्रमुक नेता एमके स्टालिन, राजद नेता तेजस्वी यादव, नेशनल काँफ्रेंसचे उमर अब्दुल्लासोबत अनेक वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More