मोदींची मोठी घोषणा, ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

मोदींची मोठी घोषणा, ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार

नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने’चा कालावधी नोव्हेंबरपर्यंत वाढविल्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत मागील तीन महिने गरीब जनतेला मोफत धान्य वाटप करण्यात आले. आज या योजनेचा कालावधी समाप्त होणार होता. मात्र पंतप्रधानांच्या घोषणेनंतर या योजनेअंतर्गत आता नोव्हेंबरपर्यंत दर महिन्याला देशाच्या ८० कोटींहून अधिक गरीब कुटुंबातील व्यक्तींना ५ किलो गहू किंवा ५ किलो तांदूळ तसेच प्रत्येक कुटुंबाला १ किलो चणा मोफत मिळणार आहे.

पंतप्रधानांनी सांगितले, ‘लॉकडाऊनमध्ये एकाही गरीबाच्या घरात चूल न पेटण्याची स्थिती निर्माण होऊ नये, याकडे विशेष लक्ष देण्यात आले. इतक्या मोठ्या देशात कुठेही आपले गरीब बांधव उपाशी झोपू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. लॉकडाऊन झाल्यानंतर सरकारने पावणे दोन लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. २० कोटी गरिबांच्या जनधन खात्यात ३१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले, तर ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. त्याचबरोबर गावात रोजगार देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार अभियान वेगाने सुरू केला, त्यावर सरकार ५० हजार कोटी रुपये खर्च करतेय. तसेच आणखी एक जगाला चकित करणारी बाब म्हणजे, कोरोनाशी लढत असतानाही भारतात ८० कोटीहून अधिक कुटुंबियांना मोफत राशन देण्यात आले. हा आकडा अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या अडीच पटीने, तर ब्रिटनच्या एकूण लोकसंख्येच्या १२ पटीने अधिक आहे. देशातील गरिबांना मागील तीन महिने आणि पुढील पाच महिने मोफत धान्य पुरविण्यासाठी जवळपास दीड लाख कोटी खर्च आला आहे’, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. ते म्हणाले, ‘सरकार हा खर्च करू शकते कारण देशातील शेतकरी प्रामाणिकपणे कष्ट करतोय आणि देशाची सर्वसामान्य जनता प्रामाणिकपणे कर भरतेय.’ तुम्ही देशाचा अन्न भांडार भरला आहे, तुमच्या परिश्रमामुळे ही मदत देणे शक्य असल्याचे सांगत पंतप्रधानांनी शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे आभार मानले.

ते म्हणाले, ‘आपण अनलॉक २सह सर्दी-तापाच्या ऋतूतही प्रवेश करतोय. त्यामुळे सर्वांना काळजी घेण्याची विनंती आहे. इतर देशांतील मृत्यूदराच्या तुलनेत भारत मागे आहे. भारताने लाखो लोकांचं आयुष्य वाचवलं आहे. परंतु जेव्हा देशात लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा त्याचे पालन कठोरपणे करण्यात आले. मात्र आता लोकांमध्ये बेजबाबदारपणा वाढत चालला आहे. आज आपल्याला अधिक सतर्कतेची आवश्यकता असताना असा वाढता बेजबाबदारपणा चिंताजनक आहे. आता सर्वांनी सतर्कता दाखविणे आवश्यक आहे. विशेषत: कंटेनमेन्ट झोनमध्ये आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यावे लागेल. नियमांचे पालन न करणाऱ्यांना आपण अडवून समज द्यावी लागेल. एका देशाच्या पंतप्रधानांनी सार्वजनिक स्थळी मास्क न घातल्याने त्यांना १३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. भारतातही अशाच प्रकारे स्थानिक प्रशासनाने काम करायला हवे, असे म्हणत भारतात गावाचा प्रधान असुदे किंवा देशाचा पंतप्रधान असुदे, कोणीही नियमाहून मोठा नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

तसेच येणाऱ्या काळात आपले प्रयत्न अधिक वेगवान करू, निरंतर काम करू, आत्मनिर्भर भारतासाठी दिवस-रात्र एक करू, आपण लोकलसाठी व्होकल होऊ, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. त्यांनी सांगितले, ‘आपण १३० कोटी देशवासीयांनी एकत्र येऊन संकल्पाने काम करायचे आहे, पुढे जायचे आहे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, २ फुटाचं अंतर पाळा आणि मास्कचा वापर करा.’

‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’चे स्वप्न

संपूर्ण भारतासाठी एक देश, एक रेशनकार्डचे स्वप्न असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज म्हटले. जे लोक आपल्या मूळ गावापासून इतर गावी, इतर राज्यात कामासाठी जातात, त्यांना याचा फायदा होईल, असे ते म्हणाले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये प्राप्त

मुंबई – राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत निधी काल प्राप्त झाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती – कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या विविध अडचणींचा सामना करत शासन- प्रशासनाने विविध सुविधा व योजनांना चालना दिली. प्रभावी उपचारयंत्रणेसाठी प्रयोगशाळा, प्लाझ्मा सुविधा, कोविड...
Read More
post-image
देश

चीनचा डोळा आता हिंद महासागरावर,पाकिस्तानच्या बंदरात खलबतं सुरू

मुंबई -चीन भारतविरोधी सतत कारवाया करत असून आता चीनचा हिंद महासागरावरही डोळा आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल...
Read More
post-image
Uncategoriz देश शिक्षण

स्कूल फ्रॉम होममुळे ७२.८% विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम, सर्वेक्षण

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्कूल फ्रॉम होम सुरू झाले आहे. मात्र या नव्या पद्धतीचं शिक्षण घेताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना कसरत करावी लागत...
Read More
post-image
देश

‘या’ आयटी कंपनीत ५०० कर्मचारी कपात, भारतीय परदेशातून परतणार

नवी दिल्ली -भारतातील अनेक तंत्रकुशल नागरिक इंग्लड, अमेरिकेसारख्या देशात नोकरीसाठी वात्सव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारण, का आघाडीच्या आयटी...
Read More