कल्याण येथील पत्री पुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल – eNavakal
महाराष्ट्र मुंबई

कल्याण येथील पत्री पुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल

कल्याण – रस्ते विकास महामंडळामार्फत कल्याण शिळफाटा रोडवरील जुना पत्री पूल पाडून नव्याने पूल बांधण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. रस्ते विकास महामंडळामार्फत कल्याण शिळफाटा रोडवरील जुना पत्री पूल पाडून नव्याने पूल बांधण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. बांधण्यात येणाऱ्या नव्या पत्री पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून पुलावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी मोठी क्रेन पत्री पुलाच्या बाजूला आणण्यात येणार असून आजपासून 24 ऑगस्टच्या रात्री दहा ते पहाटे पाच या कालावधीत पत्री पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अवजड वाहनांनाही बंदी घालण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणवरून पत्री पूलमार्गे शिळफाट्याकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना राजणोली नाका येथे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.पर्यायी मार्ग म्हणून वाहनचालकांना जनोली नाका येथून राष्ट्रीय महामार्ग 3 वरून खारेगाव टोलनाका-मुंब्रा बायपासमार्गे पुढे जावे लागणार आहे. त्याचबरोबर कल्याण-शिळफाट्याकडे जाणाऱ्या मध्यम आणि हलक्या वाहनांना दुर्गामाता चौकात बंदी घालण्यात आली असून या वाहनांनी चौकातून डाव्या बाजूने आधारवाडी चौक, खडकपाडा चौक, भवानी चौक, प्रेम ऑटो सर्कल, सुभाष चौक, वालधुनी रेल्वे ब्रिजवरून जावे लागणार आहे. दरम्यान, 22 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरु होणार असल्याने खरेदीसाठी नागरिकांची बाजारात ये-जा सुरु होणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस ही ‘कोंडी’ कशी फोडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

कल्याण येथील पत्री पुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल

कल्याण – रस्ते विकास महामंडळामार्फत कल्याण शिळफाटा रोडवरील जुना पत्री पूल पाडून नव्याने पूल बांधण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. रस्ते विकास महामंडळामार्फत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबई-ठाण्यात ४-५ दिवस जोरदार पावसाची शक्यता

मुंबई – दोन आठवडाभरापासून राज्यात पावसाचा जोर कायम आहे. परंतु येत्या ४ ते ५ दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढेल आणि मुंबई-ठाण्यात मुसळधार पाऊस होईल,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

तबलिगी जमात प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी

मुंबई- तबलिगी जमातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. आज मुंबईतील अंधेरी, एस.व्ही. रोडसह एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापे...
Read More
post-image
देश राजकीय

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर! प्रकृती खालावली, फुप्फुसाला संसर्ग

नवी दिल्ली – भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे कोरोनावर उपचार घेत असतानाच त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत चालली आहे. आधी त्यांच्या मेंदूत गाठ झाल्याने...
Read More
post-image
देश वाहतूक हवामान

दिल्लीत पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम या परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी नोएडा,...
Read More