#PakistanElections2018 इम्रान खान पंतप्रधान होणार? – eNavakal
आघाडीच्या बातम्या निवडणूक विदेश

#PakistanElections2018 इम्रान खान पंतप्रधान होणार?

इस्लामाबाद – पाकिस्तानात काल सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान पार पडले. त्यानंतर रात्रीपासून सुरु झालेल्या मतमोजणीत पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्ष आघाडीवर आहे. इम्रान खान यांच्या पक्षाने 121 जागांवर आघाडी मिळाली आहे. शेवटपर्यंत ही आघाडी अशीच टिकून राहिली तर प्रथमच इम्रान खान यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची संधी मिळेल.

पाकिस्तानमध्ये काल निवडणुकांसाठी मतदान पार पडले. सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू होते. त्यानंतर मतदानाच्या मोजणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी १२१ जागांवर इमरान खान यांच्या पक्षाने आघाडी घेतली आहे. तर नवाझ शरीफ यांच्या पक्षाने 58 जागांवर आघाडी घेतली आहे. 272 जागांसाठी जवळजवळ 100 राजकीय पक्ष या निवडणुकीत उतरले आहेत. या निवडणुकीत नवाझ शरीफ, इमरान खान, बिलावल भुट्टो यांच्या पक्षात मोठी चुरस रंगली होती. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लिगचे शहाबाज शरीफ (नवाज शरीफ यांचा भाऊ) आणि पीपल्स पार्टीचे बिलावल भुत्तोंची हार झाली आहे. तर मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईद याच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.

इम्रान खान भावी पंतप्रधान?

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरच्या सातपाटी परिसरात यंदा पापलेटच्या उत्पादनात घट

पालघर – राज्यासह जगभरात निर्यात होणार्‍या पालघरच्या सातपाटी परिसरातील पापलेट या मत्स्याच्या प्रकारामध्ये यंदा प्रचंड घट झाली आहे. पापलेटचे उत्पादन गेल्या हंगामापेक्षा 190 टनांनी घटले...
Read More
post-image
देश

मनोहर पर्रिकरांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद

पणजी – गोव्यामधील मिरामार बीचवर गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात...
Read More
post-image
देश

भाजपाकडे २ हजार कोटी कुठून आले? मायावतींची आगपाखड

नवी दिल्ली – बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांना जबरदस्त आर्थिक दणका बसला आहे. त्यांचा भाऊ आनंदकुमार याचा नोएडा येथील ७ एकर भूखंड गुरुवारी...
Read More