कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी, भारताची मागणी मान्य – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी, भारताची मागणी मान्य

नवी दिल्ली – भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव हे सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असून त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तान सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार भारतीय उच्चायोगाचे अधिकारी वकिलांसोबत परराष्ट्र मंत्रालयात दाखल झाले आहेत.

कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाविरोधात याचिका दाखल करम्यास बुधवारी सायंकाळी उशिराने परवानगी दिली. त्यामुळे आता भारतीय अधिकारी कुलभूषण जाधव यांना पुर्नविचार याचिकेवर हस्ताक्षर करण्यासाठी मदत करणार आहेत. पाकिस्ताननं भारतीय उच्चायोगाला दुसऱ्यांदा कॉन्सुलर अॅक्सेसची परवानगी दिलीय. जाधव यांना भेटण्यासाठी पाकिस्ताननं काही अटीही समोर ठेवल्या आहेत. भेटीदरम्यान भारतीय अधिकारी आणि जाधव यांना इंग्रजी भाषेतच संवाद साधावा लागणार आहे. तसंच यावेळी पाकिस्तानी अधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं बुधवारी सायंकाळी उशिरा जाधव किंवा त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधी किंवा इस्लामाबादमध्ये भारताच्या राजदूतांना याचिका दाखल करण्याची परवानगी दिली होती. यापूर्वी पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांनी स्वत: इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचं सांगितलं होतं. परंतु, भारतानं मात्र पाकिस्तानचा हा दावा धुडकावून लावत ‘कॉन्सुलर अॅक्सेस’साठी प्रयत्न सुरूच ठेवले होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मुंबई

९८ वर्षांच्या आजोबांनी १९ दिवसांत केली कोरोनावर मात

मुंबई – देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आहेत. देशात ६० वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे कोरोनामुळे सर्वाधिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी मुंबई पालिकेची नवी नियमावली, घरातच सक्तीने राहावं लागणार क्वारंटाइन

मुंबई – देशातील विविध राज्यातून मुंबईत परप्रांतीयांचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळे मुंबई पालिकेने बाहेरून येणाऱ्यांसाठी नवे नियम तयार केले आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना...
Read More
post-image
मनोरंजन

ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कागदपत्रे घेऊन पुन्हा कार्यालयात दाखल

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे. ईडीच्या चार अधिकाऱ्यांकडून गेल्या काही तासांपासून रियाची चौकशी सुरु आहे. ईडी कार्यालयात...
Read More
post-image
महाराष्ट्र

तपासणी नाका टाळण्यासाठी गोदावरी पात्रातून जीवघेणा प्रवास

परभणी – परभणीच्या पाथरीतून बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे जाण्यासाठी, पाथरीमधील नागरिक तपासणी नाका टाळून थेट गोदावरी नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करत असल्याची बाब समोर आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशातील पहिली ‘किसान रेल’ साप्ताहिक देवळाली – दानापूर दरम्यान सुरू

नवी दिल्ली – केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात किसान रेल चालवण्याची घोषणा केली होती. मोदी सरकारचे हे वचन आज पूर्ण झाले. आता देशातील शेतकरी...
Read More