पिंपरीत राष्ट्रवादीच्या आणखी एका नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू – eNavakal
महाराष्ट्र

पिंपरीत राष्ट्रवादीच्या आणखी एका नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आणखी एका विद्यमान नगरसेवकाचा कोरोनामूळे मृत्यू झाला आहे. जावेद शेख असे त्यांचे नाव असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते. १५ जुलै रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून आकुर्डीतील स्टार या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला, मग पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण काल मात्र त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. ते ४९ वर्षाचे होते. बकरी ईदच्या आदल्या दिवशी ही दुःखद वार्ता कळल्याने कुटुंबियांसह समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शेख यांच्याकडून गरजूंना मदतकार्य सुरू होते. त्यामुळे त्यांचा अनेकांशी थेट संपर्क येत होता. अशातच शेख यांना कोरोनाची लक्षणे आढळू लागली, त्यामूळे त्यांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले. १५ जुलैला अहवाल आला आणि त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मग ते तातडीने आकुर्डीतील स्टार या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. अगदी पाच दिवसांपूर्वीच त्यांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलणे ही झाले होते. त्यावेळी त्यांच्या तब्येतील कमालीची सुधारणा होती. पण नंतर शेख यांना न्युमोनिया झाला आणि हळूहळू काही अवयव निकामी होऊ लागले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तरी ही तब्येतील फारशी सुधारणा झाली नाही आणि काल अखेर त्यांची मृत्यूशी झुंज संपली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा; काजू व्यावसायिकांना राज्य जीएसटीची शंभर टक्के प्रतिपूर्ती

मुंबई – काजू व्यावसायिकांना चालू आर्थिक वर्षापासून राज्य वस्तू आणि सेवा कराच्या (स्टेट जीएसटी) रकमेची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र

पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक येथे दाखल

मुंबई – पार्थ पवार अपरिपक्व आहेत, असं शरद पवारांनी वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पार्थ पवार आता वेगळा राजकीय स्टॅण्ड घेणार...
Read More
post-image
महाराष्ट्र

एमपीएससीची परीक्षा आता राज्यातील सर्व विभागीय केंद्रावर होणार

मुंबई – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबरला होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज ११ हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद, तर ९ हजारपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई – राज्यात आज 11 हजार 813 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून एकूण संख्या आता 560126 पोहोचली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत ३३० नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात  आज ३३० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ३०९ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३३० रूग्णांमुळे पालिका...
Read More