चिनी कंपन्यांची आयपीएल’मधील भागीदारी तोडा, उद्योगपती नेस वाडिया यांची बीसीसीआयकडे मागणी  – eNavakal
क्रीडा देश

चिनी कंपन्यांची आयपीएल’मधील भागीदारी तोडा, उद्योगपती नेस वाडिया यांची बीसीसीआयकडे मागणी 

मुंबई – भारताच्या सीमेत घुसखोरी करून भारतीय सैनिकांवर हल्ला करणाऱ्या चीनला भारताने जबरदस्त धडा शिकविला आहे. भारताने चीनच्या 59 ॲप्सवर बंदी घातली आहे. आता किंग्स इलेव्हन पंजाबचे मालक उद्योगपती नेस वाडिया हेदेखील आयपीएलमधील चिनी प्रायोजक कंपन्यांशी आर्थिक संबंध तोडण्याच्या विचारात आहेत. बीसीसीआयने देखील पेटीएमसहित सर्व चिनी प्रायोजक कंपन्यांवर बंदी घालावी, अशी मागणी नेस वाडिया यांनी केली आहे.

15 जूनच्या चीनच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झालेले आहेत. या जवानांनी मरता मरता पाकिस्तानच्या 40 सैनिकांचा खातमा केला. त्यानंतर भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची जोरदार लाट उसळली आहे. केंद्र सरकारनेही अनेक चिनी कंपन्यांशी असलेले करार रद्दबातल केले आहेत. आता तर चीनच्या 59 ॲप्सवर भारताने बंदी घातली आहे. याबाबत बोलताना किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे मालक नेस वाडिया यांनी सांगितले की, आयपीएल मधील चिनी प्रायोजकांची आर्थिक संबंध तोडणे गरजेचे आहे. आमच्यासाठी देश प्रथम आणि पैसा नंतर आहे. ही इंडियन प्रीमियर लीग आहे चीन प्रीमियर लीग नव्हे ! चिनी कंपन्यांशी आर्थिक संबंध तोडून देशासमोर एक उदाहरण ठेवले पाहिजे. चीनी कंपन्यांना आता घरचा रस्ता दाखवला पाहिजे. आपल्याला देश आणि सरकारचा आदर केला पाहिजे. स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांचा ही आम्हाला आदर आहे, असे नेस वाडिया यांनी सांगितले.

चीनमधील मोबाईल कंपनी “विवो मोबाईल” कंपनी ही आयपीएलमधील मोठी प्रायोजक कंपनी आहे. दरवर्षी ही कंपनी भारतीय क्रिकेट बोर्डाला म्हणजेच बीसीसीआयला 440 कोटी रुपये देते 2022 पर्यंत या कंपनीचा बीसीसीआय करार आहे. त्याचप्रमाणे आयपीएलची संबंधित “पेटीएम”, “ड्रीम इलेव्हन” आणि “स्विगी” या कंपन्यांमध्येही ही चीनचा पैसा आहे. त्यामुळे आयपीएलमधील क्रिकेट संघाच्या मालकांनी आणि बीसीसीआयने देखील चिनी प्रायोजक कंपन्यांशी आर्थिक संबंध तोडले पाहिजेत, असे नेस वाडिया यांनी सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये प्राप्त

मुंबई – राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत निधी काल प्राप्त झाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती – कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या विविध अडचणींचा सामना करत शासन- प्रशासनाने विविध सुविधा व योजनांना चालना दिली. प्रभावी उपचारयंत्रणेसाठी प्रयोगशाळा, प्लाझ्मा सुविधा, कोविड...
Read More
post-image
देश

चीनचा डोळा आता हिंद महासागरावर,पाकिस्तानच्या बंदरात खलबतं सुरू

मुंबई -चीन भारतविरोधी सतत कारवाया करत असून आता चीनचा हिंद महासागरावरही डोळा आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल...
Read More
post-image
Uncategoriz देश शिक्षण

स्कूल फ्रॉम होममुळे ७२.८% विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम, सर्वेक्षण

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्कूल फ्रॉम होम सुरू झाले आहे. मात्र या नव्या पद्धतीचं शिक्षण घेताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना कसरत करावी लागत...
Read More
post-image
देश

‘या’ आयटी कंपनीत ५०० कर्मचारी कपात, भारतीय परदेशातून परतणार

नवी दिल्ली -भारतातील अनेक तंत्रकुशल नागरिक इंग्लड, अमेरिकेसारख्या देशात नोकरीसाठी वात्सव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारण, का आघाडीच्या आयटी...
Read More