फ्रान्समधून भारतात दाखल झालेल्या राफेलचे वैशिष्ट्य काय? पाकिस्तान-चीनला पडणार भारी – eNavakal
ट्रेंडिंग

फ्रान्समधून भारतात दाखल झालेल्या राफेलचे वैशिष्ट्य काय? पाकिस्तान-चीनला पडणार भारी

भारतातील हवाई दल सुसज्ज करण्यासाठी २०१६ साली भारताने फ्रान्स सरकारबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटींचा करार केला होता. त्यानुसार ३६ राफेलपैकी ५ राफेल विमानं आज भारताला सुपूर्दर करण्यात आली आहेत. ही विमाने अत्याधुनिक शस्त्रास्रांनी सुसज्ज आहेत. अमेरिका आणि चीनकडे ज्याप्रकारे फायटर विमानं आहेत, त्याच्या तोडीसतोड हे रायफल विमान असल्याचं सांगितलं जातंय. या राफेल विमानाची नेमकी वैशिष्ट्यं काय आहेत हे जाणून घेऊयात.

वाचा राफेल विमानांची पहिली तुकडी अंबाला एअरबेसवर दाखल

राफेलचे वैशिष्ट्य

  • राफेल विमान प्रतितास २,१३० किलोमीटर वेगाने उड्डाण करु शकते.
  • राफेलच्या पंखांची ज्या पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे, त्यामुळे युद्धाच्या प्रसंगात ही विमाने सरस ठरतील.
  • आठ विमानांची काम एकटं राफेल करु शकते. म्हणून या विमानाला मल्टीरोल फायटर जेट म्हटलं जातं. यापूर्वी टेहळणी, जमिनीवर हल्ला, हवेतून हवेत हल्ला करण्यासाठी वेगवगेळी विमान लागायची. राफेलमुळे या वेगवेेगळ्या विमानांची गरज भासणार नाही.
  • एखाद्या लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची क्षमता या राफेलमध्ये आहे. म्हणून हे विमान इतरांपेक्षा सरस ठरते.
  • हे राफेल विमान सिंगल आणि टी सीटर असून सेमी स्टेल्थ फायटर विमान आहे. पूर्णपणे स्टेल्थ विमान सहसा रडारला दिसत नाही. सध्या अमेरिकेची F-22 आणि F-35 ही दोन विमाने पूर्णपणे स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. राफेल चौथ्या पिढीचे विमान आहे.
  • विनाशस्त्रास्त्र राफेलचे वजन ९९०० ते १०६०० किलो आहे. राफेलची कुठली आवृत्ती आहे, त्यावर अवलंबून आहे. २४,५०० किलो वजन वाहून नेण्याची राफेलची क्षमता आहे.
  • विमान कितीही उंचीवरुन उड्डाण करु शकत असेल किंवा कितीही वेग असला तरी त्या विमानामध्ये घातक शस्त्रे, रडार नसेल तर त्या वेगाचा काही उपयोग नाही. राफेलच्या रडारमध्ये १०० किलोमीटरच्या रेंजमधील ४० टार्गेट शोधण्याची क्षमता आहे.
  • मिका, मिटिओर, स्काल्प या क्षेपणास्त्रांमुळे शत्रुची विमाने राफेलच्या फार जवळ येण्याचे धाडस करणार नाहीत.
  • राफेलमधून अण्वस्त्र हल्ला सुद्धा करता येऊ शकतो. तसंच, राफेल एका मिनिटांत ६० हजार फूट उंचीवर पोहोचू शकते. सर्वाधिक उंची आणि कमी उंची दोन्ही ठिकाणी हे विमान उत्तमपणे आपले कार्य करु शकते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यातील पहिल्या टेलिआयसीयू प्रकल्पाचा भिवंडीत शुभारंभ

मुंबई – भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा ऑनलाईन शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिदक्षता...
Read More
post-image
देश मनोरंजन

गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती खालावली

मुंबई – सुप्रसिद्ध गायक एस.पी.सुब्रमण्यम यांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यामुळे त्यांना आता अतिदक्षता विभागात हालवण्यात आलं असून, डॉक्टर्स त्यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज 12 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद, तर 10 हजारपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई, दि.१४ : राज्यात १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

स्वातंत्र्यादिनानिमित्त राज्यातील 58 पोलिसांचा गौरव, केंद्राकडून पोलिस पदके जाहीर

नवी दिल्ली – 74व्या भारतीय स्वातंत्र्यादिनानिमतित्त देशातील एकूण ९२६ पोलीस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्यात येणार आहेत. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने आज त्यांची नावे जाहीर केली. पोलिसांच्या...
Read More
post-image
Uncategoriz

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांची मदत

मुंबई – कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास...
Read More