वाढदिवस विशेष : अभ्यासू खासदार सुप्रिया सुळे – eNavakal
दिनविशेष

वाढदिवस विशेष : अभ्यासू खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आज ३० जुन रोजी वाढदिवस आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी स्वतःचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी थोडक्यात जाऊन घेऊ.

सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ साली पुण्यात झाला. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या आहेत. राजकारणाचा वारसा असतानाही सुप्रिया सुळे यांनी स्वजबळावर आपला एक वेगळा ठसा उमटवला. लोकसभेत अभ्या्सू मुद्दे मांडणा-या, सर्व सामान्यांच्या हक्कासाठी भांडणा-या सुप्रिता सुळे या कॉलेजमध्ये मात्र लाजाळू होत्या. त्यांचे शालेय शिक्षण नाना चौकातील सेंट कोलंबस हायस्कूलमध्ये झाले. पुढे बारावीनंतर मेडीकल बद्दलची भीती आणि इंजिनियरिंग बद्दलची नावड यातून त्यां नी जयहिंद कॉलेजमधून मायक्रोबायोलॉजीमध्ये बीएससी केले.  त्यांचे वडील शरद पवार मुख्यमंत्री असतानाही त्याय एसटी बसनेच कॉलेजमध्ये ये-जा करत. त्यानंतर ‘सकाळ’ वृत्तसमूहात त्यांनी काही काळ नोकरीही केली. उच्च विचारांच्या कुटुंबात सुप्रिया सुळे यांची जडणघडण झाली. त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याच पूर्ण स्वातंत्र्य होते. अमुकच शिकलं पाहिजे,तमुकच झालं पाहिजे,अशी कसलीही सक्ती कधीच झाली नाही. न शिक्षणाबाबत, न लग्नाबाबत. त्यांंच्या आयुष्याचे सगळे निर्णय त्यां नीच घेतले आणि विशेष म्हणजे त्यांच्या पाठीशी शरद पवार आणि कुटुंबीय भक्कमपणे उभे राहिले.

सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बहिणीचे पुत्रही आहेत. पण, तरीही ते अमेरिकेत नोकरीत करत. लग्नाननंतर सुप्रिया सुळे या सदानंद यांच्याेबरोबर अमेरिकेत गेल्या. त्यांनी तिथे बर्कले युनिवर्सिटीत प्रवेश घेऊन आपले खंडित शिक्षण सुरू केले. तिथे जलप्रदूषणावर त्यांनी एक पेपरही सादर केला होता. नंतर सदानंद सुळे यांच्या बदलीमुळे त्यांना सिंगापूरला यावे लागले. काही वर्ष जकार्ताला राहून ११ वर्षांपूर्वी हे दाम्पत्य भारतात परतले व सुप्रिया सुळे यांनी राजकारणात प्रवेश केला. शैक्षणिक असो, सामाजिक असो व राजकीय कार्य, प्रत्येक वेळी सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे त्यां ना प्रोत्साहन देतात. राज्यसभेवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली व सध्या सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आपल्या वडिलांच्या प्रमाणेच चित्रकला, साहित्य, विज्ञान यासह इतरही अनेकविध सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये विशेष रुची आहे. सुप्रिया सुळे या २०१९ च्या निवडनुकीत परत खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

संजीव वेलणकर पुणे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये प्राप्त

मुंबई – राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत निधी काल प्राप्त झाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती – कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या विविध अडचणींचा सामना करत शासन- प्रशासनाने विविध सुविधा व योजनांना चालना दिली. प्रभावी उपचारयंत्रणेसाठी प्रयोगशाळा, प्लाझ्मा सुविधा, कोविड...
Read More
post-image
देश

चीनचा डोळा आता हिंद महासागरावर,पाकिस्तानच्या बंदरात खलबतं सुरू

मुंबई -चीन भारतविरोधी सतत कारवाया करत असून आता चीनचा हिंद महासागरावरही डोळा आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल...
Read More
post-image
Uncategoriz देश शिक्षण

स्कूल फ्रॉम होममुळे ७२.८% विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम, सर्वेक्षण

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्कूल फ्रॉम होम सुरू झाले आहे. मात्र या नव्या पद्धतीचं शिक्षण घेताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना कसरत करावी लागत...
Read More
post-image
देश

‘या’ आयटी कंपनीत ५०० कर्मचारी कपात, भारतीय परदेशातून परतणार

नवी दिल्ली -भारतातील अनेक तंत्रकुशल नागरिक इंग्लड, अमेरिकेसारख्या देशात नोकरीसाठी वात्सव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारण, का आघाडीच्या आयटी...
Read More