नाशिकची विमानसेवा सोमवारपासून होणार सुरू – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाशिकची विमानसेवा सोमवारपासून होणार सुरू

नाशिक – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबांचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी शिर्डी-हैदराबाद आणि नाशिक-अहमदाबाद ही विमानसेवा सोमवारपासून सुरू केली जाणार आहे. या दोन्ही विमानसेवांना नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. यामुळे शिर्डी आणि परिसरात अडकलेल्या नागरिकांचा परतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिर्डी-हैदराबाद विमानसेवेबरोबरच नाशिक-अहमदाबाद ही विमानसेवाही सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यासाठी नाशिक विमानतळावर तयारी सुरू झाली असून नागरी विमान उड्डाण आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांनुसार येथे निर्जंतूकीकरण व इतर उपाययोजना केल्या जात आहेत. ही विमानसेवा सुरू करताना प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग व इतर गोष्टींचीही खबरदारी घेतली जाणार आहे. या दोन्ही विमानसेवांचे ८ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या विमानसेवांबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More
post-image
महाराष्ट्र

साताऱ्यात २४ तासांत २७ जण कोरोना पॉझिटिव्ह; तर दोघांचा मृत्यु

सातारा – सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २७जण पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांचा आकडा ३३६ वर पोहचला आहे. तसेच या कालावधीत वाई तालुक्यातील दोन कोरोनाबाधीत...
Read More
post-image
मनोरंजन

ईदनिमित्त भाईजानकडून ५,००० कुटुंबांना अन्नदान

मुंबई – सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. त्याचा मोठा फटका बहुतांश मजुरांना बसला आहे. अशा संकटाच्या काळात ईदच्या दिवशी कुणीही उपाशी राहू नये. यासाठी अभिनेता...
Read More
post-image
अपघात

कोपरगाव -सिन्नरच्या सीमेवर ट्रकने चेकपोस्टला उडवले

शिर्डी – कोपरगाव -सिन्नर तालुक्यातील सीमेवर पाथरे फाटा येथे लावण्यात आलेल्या चेकपोस्ट जवळच्या तंबूत नाशिकहून भरधाव येणारा ट्रक काल रात्री घुसला आणि कर्तव्यावर असलेले...
Read More
post-image
मुंबई

केईएमच्या शवागृहाची विदारक स्थिती; मृतदेह ठेवायला जागाच नाही!

मुंबई – मुंबईत कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच केईएम रुग्णालयातील शवागृह मृतदेहांनी खचाखच भरले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या...
Read More