मध्य-हार्बरवर उद्या ‘मेगाब्लॉक’; ‘परे’वर आज रात्रकालीन ब्लॉक – eNavakal
आघाडीच्या बातम्या वाहतूक

मध्य-हार्बरवर उद्या ‘मेगाब्लॉक’; ‘परे’वर आज रात्रकालीन ब्लॉक

मुंबई – रेल्वेच्या मध्य आणि हार्बर माग्र्गावर उद्या मेगाब्लॉक गेह्ण्यात येणार आहे. तर पश्चिम मार्गावर आज पाच तासांचा विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेने घोषित केला आहे.

माटुंगा रोड ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप जलद मार्ग आणि पाचव्या मार्गावर पाच तासांचा रात्रकालीन ब्लॉक पश्चिम रेल्वेने घोषित केला आहे. १५ डिसेंबरला रात्री ११.४५ ते १६ डिसेंबरला मध्यरात्री ३.४५ पर्यंत ब्लॉक काळातील कामे करण्यात येईल. या काळात सांताक्रूझ ते चर्चगेट स्थानकादरम्यान लोकल फेऱ्या अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या मशीद स्थानक-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडील पादचारी पुलाचे ३ गर्डर १४० टन क्रेनद्वारे बसविण्यात येणार आहेत. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा अप-डाऊन धिम्या तसेच जलद मार्गावर सकाळी १० वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. तर, सीएसएमटी आणि वडाळा रोड अप-डाऊन हार्बर मार्गावर १० वाजून ३० मिनिटांपासून ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. या काळात सीएसएमटी ते भायखळा (धिमा मार्ग) व सीएसएमटी ते वडाळा दरम्यान एकही लोकल धावणार नाही.

सीएसएमटी येथून डाऊन धिम्या मार्गावर कल्याणसाठी सकाळी १० वाजून १४ मिनिटांनी व भायखळा येथून १० वाजून २२ मिनिटांनी सुटणारी लोकल शेवटची असेल. डाऊन हार्बर मार्गावर सीएसएमटी येथून पनवेलसाठी रविवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी सुटणारी व वडाळा रोड येथून १० वाजून २८ मिनिटांनी सुटणारी लोकल शेवटची असेल. मध्य रेल्वेच्या अप धिम्या मार्गावर भायखळा येथून सकाळी ९ वाजून ५० मिनिटांची आणि सीएसएमटीकडे सकाळी ९ वाजून ५९ मिनिटांची शेवटची गाडी असेल. अप हार्बर मार्गावरील वडाळा येथून सकाळी ९ वाजून ५२ मिनिटांनी सुटणारी आणि सीएसएमटीवर सकाळी १० वाजून १० मिनिटांनी पोहोचणारी शेवटची गाडी असेल.

ब्लॉकदरम्यान सॅण्डहर्स्ट रोड व मशीद स्थानकांत कोणतीही लोकल थांबणार नाही. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावर सीएसएमटी आणि वडाळादरम्यानची वाहतूक पूर्णत: बंद राहील. अप आणि डाऊन मार्गावरील धिम्या लोकल भायखळा, सीएसएमटी स्थानकांच्या दरम्यान जलद मार्गावर धावतील. वडाळा रोड ते पनवेल आणि वडाळा रोड ते वांद्रे/ गोरेगाव यांच्या दरम्यान १५ मिनिटे गाड्या उशिराने धावणार आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होईल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More