विजय मुंबई इंडियन्सचा की सेटिंगचा? धोनीची विकेट संशयास्पद! – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विजय मुंबई इंडियन्सचा की सेटिंगचा? धोनीची विकेट संशयास्पद!

मुंबई – यावर्षीच्या आयपीएल मोसमातील अंतिम सामन्यात हरणारी मुंबई एका धावेने जिंकली आणि सर्वांच्याच भुवया संशयाने उंचावल्या. हा खेळातील प्राविण्याचा विजय की सेटिंगचा विजय? अशी शंका समस्त देशवासीयांच्या मनात निर्माण झाली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत असलेल्या घराण्याकडे मुंबई इंडियन्सची मालकी आहे. त्यांच्या प्रभावाखालीच चेन्‍नई सुपरकिंगचा कप्‍तान महेंद्रसिंग धोनी याला संशयास्पदरित्या धावचित देण्यात आले. त्याला ‘आऊट’ देण्यासाठी तिसर्‍या अंपायरने तब्बल पाच मिनिटे घेतली. तसेच फलंदाजाला ‘बेनिफिट ऑफ डाऊट’ न देता धोनीला बाद जाहीर करण्यात आले.

धोनी क्रिझमध्ये पोहोचला होता. त्याची बॅट सीमारेषेच्या आत टेकली होती हे स्पष्ट दिसत होते. तरीही सर्व अँगलमधून कॅमेरे झूम करून संशय व संभ्रम वाढविण्यात आला. धोनीला बाद घोषित करण्यासाठी पाच मिनिटे लागली. तिथेच काळेबेरे झाल्याचा संशय आहे. धोनी हा चेन्‍नई सुपरकिंगचा कप्‍तान आहे. धोनी बाद होणे हा टर्निंग पॉईंट होता. धोनी बाद झाल्याने चेन्‍नईचा अवसानघात झाला. त्याचप्रमाणे सुरेश रैना, अंबाती रायडू, ब्राव्हो यांच्या बाद होण्यामागे हाराकिरी आहे की सेटिंग याचाही संशय येतो.

ज्या मुंबई इंडियन्सच्या मलिंगाने 3 षटकांत 42 धावा व तिसर्‍या षटकात 24 धावा दिल्या तो शेवटच्या षटकात एवढा कसा भारी पडला? सर्वच संशयास्पद व अत्यर्क आहे. क्रिकेट हा खेळ ‘गेम ऑफ अन्सटर्निटी’ म्हणून ओळखला जातो. मात्र कालच्या मुंबई इंडियन्स व चेन्‍नई सुपरकिंग्जच्या सामन्यात ही अनिश्‍चितता ठरवून घडविल्यासारखी वाटत होती. एकीकडे शेन वॉटसन 80 पेक्षा जास्त धावा कुटतो तिथे चेन्‍नईचे बाकीचे खेळाडू हाराकिरी करतात आणि धोनीची विकेट ढापली जाते, हे सर्वच संशयास्पद आहे. केवळ 20 कोटींचे बक्षीस आणि करंडक लागोपाठ चौथ्यांदा जिंकण्यासाठी जो पराकोटीचा खटाटोप काल पाहायला मिळाला तो क्रिकेटच्या ‘जंटलमेन्स गेम’ला शोभेसा नव्हता असेच काल वाटले. मुंबई इंडियन्सचा हा विजय निर्भेळ नाही. हरूनही चेन्‍नई जिंकली असेच राहून राहून वाटते. कारण गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्व गोष्टींमध्ये काल चेन्‍नई सरस होती. तर चेन्‍नईसमोर मुंबई सुरुवातीपासून ढेपाळलेली दिसत होती. तरीही मुंबई जिंकली. हा चमत्कार पंचांनी घडविला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

सातारा,- कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही मानवनिर्मित आहे, असा दावा करून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी असे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य

जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शक्ती केेंद्र...
Read More
post-image
News मुंबई

जोगेश्वरीत किटकनाशक पिऊन नवविवाहीत महिलेची आत्महत्या

मुंबई – जोगेश्वरी येथे एका 25 वर्षांच्या नवविवाहीत महिलेने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनी रोहित चौरसिया असे या महिलेचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नरेेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण! विक्रम भावेचा जामीन फेटाळला

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोेपी म्हणून अटक करण्यात आलेल्या विक्रम भावेचा जामीन अर्ज आज जिल्हा सत्र...
Read More
post-image
News महाराष्ट्र

विक्रमगडमधील पूल मोजताहेत शेवटची घटका

विक्रमगड – तालुक्यातील अनेक वर्षापासूनचे पूल मोडकळीस आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ब्रिटीशकालीन विक्रमगड-गडदे मार्गावरील तांबडी नदीचा पूल, साखरे गावातील देहेर्जे नदीवरील पूल, नागझरी बंधारा...
Read More