परीक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन – eNavakal
देश शिक्षण

परीक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील १० वी व १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  यावेळी पंतप्रधानांनी तणावमुक्‍तीच्या संदर्भात धडे दिले. तसेच देशभरातील विद्यार्थ्यांशी व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंग द्वारे संवाद साधला. देशभरातून सुमारे १० कोटी विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होत झाल्याचे समजत आहे .दिल्‍लीतील तालकटोरा मैदानात हा कार्यक्रम झाला.

संवादाच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी मी आज पंतप्रधान म्हणून नाही तर एक मित्र म्हणून तुमच्याशी गप्पा मारणार आहे असे सांगितले. परीक्षेआधीचा तणाव दूर करण्याचा प्रयत्न पंतप्रधान करत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उदाहरणांसह तणावमुक्त राहण्यासाठी टीप्सही देत आहेत. परीक्षेची तयारी, आत्मविश्वास, करीअर यासंदर्भात मोदी मार्गदर्शन करत असताना पालकांनी आपल्या इच्छा मुलांवर लादू नयेत असा सल्ला त्यांनी पालकांना दिला आहे.

विशेष म्हणजे मुलांनादेखील आपल्या मनातील प्रश्न आणि शंका पंतप्रधानांना मोकळेपणे विचारल्या.पंतप्रधानांनी त्यांच्या प्रश्नांना त्यांच्याशी खूप अनौपचारिकपणे आणि आपलेपणाने उत्तरे दिली. परीक्षा काळात स्वतःला फक्त अभ्यासामध्ये कोंडून घेण्यापेक्षा त्यातून ब्रेक घ्या,निसर्गाच्याजवळ जा,मित्रमैत्रिणींना भेटा यामुळे तुमच्यात नवा उत्साह येईल आणि तुम्ही उत्साहाने अभ्यासाला लागू शकाल. तसेच योग आणि मेडिटेशन करून आपले मन शांत ठेवण्यास मदत होते असेही त्यांनी सांगितले.योगा हा एकाग्रता वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे.मेहनत आणि स्वत:ला आव्हान देता त्यातून आत्मविश्वास निर्माण होतो, आपण नेहमी स्वत:मध्ये सुधारणांचा प्रयत्न केला पाहिजे

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

ससून रुग्णालय अजून सज्ज का नाही?

पुणे – ससून रुग्णालयाची नवी इमारत बांधून तयार आहे. तिथे कोरोना रुग्णांसाठी ८५० खाटांचे स्वतंत्र दालन सुरू होऊ शकते. हे दालन सुरू होईल असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

दहा जिल्ह्यांतून प्रवास करून ते सहाजण पोहचले गावाला

वर्धा – भारतातील सर्व राज्य आणी जिल्ह्यांच्या सीमा बंद असूनही तब्बल दहा जिल्ह्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून सहा मजूर आपल्या गावी पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत ५२६ कोरोनाग्रस्त, ३४ जणांचा मृत्यू

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
महाराष्ट्र

सीईटी बरोबर विद्यापीठाच्या परीक्षा होणार – सामंत

मुंबई – राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्या अखत्यारीतील महाविद्यालयीन परीक्षेसह सीईटी परीक्षा होणारच आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती...
Read More
post-image
देश

तबलिगी जमातच्या संपर्कातील दीड हजार जणांना कोरोना संसर्ग

नवी दिल्ली – देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 4 हजार 67 इतकी झाली आहे. त्यात तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या दीड हजार जणांचा समावेश आहे....
Read More