दुकाने तीन दिवस चालू ठेवण्याची परवानगी द्या, मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र – eNavakal
महाराष्ट्र

दुकाने तीन दिवस चालू ठेवण्याची परवानगी द्या, मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पण राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यापारी, व्यावसायिक आदी क्षेत्रातून विरोध होताना पाहायला मिळतोय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडवीस, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही मुख्यमंत्र्यांना याबाबत इशारा दिलाय. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही मुख्यमंत्र्यांना एक पत्र देण्यात आलं आहे. त्यात ‘आठवड्यातून किमान ३ दिवस दुकानं चालू ठेवण्यासाठी व्यापारी वर्गास परवानगी द्यावी’, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी हे पत्र लिहिलं आहे.

वाचा – सरकार व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही, सूचनांचा गांभीर्याने विचार करावा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

कोरोनाचं सावट परत आपल्या महाराष्ट्रावर आलं आहे आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण 5 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून ब्रेक द चेन या मोहिमे अंतर्गत कठोर नियम आणि निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले. अनेक गोष्टींचा विचार करुनच आपण हे सर्व नियम आणि निर्बंध लावले असतील. पण एकंदरित पाहिलं तर त्यात व्यापारी वर्गाचा अजिबात विचार करण्यात आलेला नाही.


आपण व्यावसायिक उत्पादनांना मंजुरी दिली आहे पण मालाची पुढची शृंखला चालवणारा व्यापारी वर्ग व त्याचा व्यवसाय जर बंद असेल तर त्या तयार मालाचा उठाव आणि विक्री कशी होणार?

वाचा  राज्यात कोरोनाच्या म्युटेशन आणि स्ट्रेन्समध्ये बदल होतोय- राजेश टोपे

आज महाराष्ट्रात अंदाजित 15 लाख व्यापारी आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे कामगार आणि कामगारांचे परिवार जोडलेले आहेत. मागील वर्षाच्या मार्च महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी तसे छोटे दुकानदार यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं, ही सत्य परिस्थिती आहे. अनेक आर्थिक नुकसान सोसूनही कामगारांचे पगार, वीज बिल, सरकारी कर, सर्वकाही वेळेवर भरुन हा व्यापारीवर्ग देशाच्या उन्नतीमध्ये आपले योगदान देत आहे.

वाचा – ‘बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, वाझेंनी केलेले आरोप खोटे आहेत’

गेल्यावर्षी ज्या वेळेस लॉकडाऊन सर्व देशात लावण्यात आला तेव्हा आपण पाहिलेच असेल की महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. पण जेव्हा हाच लॉकडाऊन पुढे 4 ते 5 महिने चालू राहिला तेव्हा त्यांचे कंबरडे मोडले. त्यानंतर हळूहळू व्यवसायासाठी परवानगी मिळाल्यानंतर त्यांना स्थिरस्थावर होण्यासाठी पुढील 4 ते 5 महिनेला लागले आणि अशातच ब्रेक द चेन मोहिमे अंतर्गत आता पुन्हा 5 एप्रिलपासून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील अनेक विभागात व्यापारीवर्ग रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतोय.

देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्वाचा घटक असलेल्या व्यापारी वर्गांनी वेळोवेळी सरकार आणि प्रशासनाच्या प्रत्येक नियमांचं पालन केलं आहे. आपणही त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा आणि आपल्या राज्याच्या आर्थिक उन्नतीचा विचार करुन राजसाहेबांनी केलेल्या मागणीनुसार आठवड्यातून किमान 3 दिवस दुकाने चालू ठेवण्यास व्यापारी वर्गाला अनुमती द्यावी.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

दुकाने तीन दिवस चालू ठेवण्याची परवानगी द्या, मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पण राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यापारी, व्यावसायिक आदी...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी आता न्यायालयाचा आदेश येण्याची वाट बघावी लागेल का?, चंद्रकांत पाटलांचा सवाल

मुंबई – मुंबई  स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात एनआयए कोठडीत असलेल्या सचिन वाझे यांनी अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यावर खंडणीचा आरोप केला...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

परीक्षा पे चर्चा! परीक्षेला जीवन मृत्यूचा प्रश्न बनवू नका, पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी परीक्षा रद्द करण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्या जात आहेत. त्याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

कामगारांनी स्थलांतर करु नये, राज्य शासन कामगारांच्या पाठीशी, हसन मुश्रीफ यांचे आश्वासन

मुंबई – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कामगार विभागाचा कार्यभार स्वीकारला. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद – सिंगल यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

साताऱ्यात लसीचे डोस संपले, पुढील डोस येईपर्यंत लसीकरण बंद राहणार

सातारा – राज्यात सध्या केंद्र सरकारकडून होणाऱ्या लसींच्या पुरवठ्याविषयी राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारमधील काही नेतेमंडळींकडून केंद्र सरकारवर लसींचा महाराष्ट्राला अपुरा पुरवठा होत...
Read More