पाडवा मेळाव्यात मनसे घेणार निर्णायक भूमिका; मावळ, शिरूरमध्ये सभांचे नियोजन – eNavakal
निवडणूक महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

पाडवा मेळाव्यात मनसे घेणार निर्णायक भूमिका; मावळ, शिरूरमध्ये सभांचे नियोजन

पिंपरी – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मावळ आणि शिरूर मतदार संघात मनसे निर्णायक मुद्यांवर काम करणार आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड मनसेच्या पदाधिका-यांची आज मुंबईतील कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक घेतली. दोन्ही मतदार संघातील मनसेच्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात मनसे मैदानात उतरणार असल्याची घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलीच आहे. त्यासाठी मतदार संघनिहाय नागरिकांना भेडसावणा-या प्रमुख मुद्यांवर कार्याकर्त्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. आज बुधवारी (दि.२७) दुपारी एक वाजता मुंबईला कृष्णकुंजवर ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवडच्या मनसैनिकांची बैठक घेतली. गुडी पाडव्याला मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील मनसेची भूमिका निश्चित होईल. त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते कामाला लागतील, असे ठरविण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.

यावेळी पिंपरी-चिंचवड प्रभारी किशोर शिंदे, शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहरअध्यक्ष राजू सावळे, बाळा दानवले, मनविसे शहराध्यक्ष हेमंत डांगे, नाशिर शेख, शहर सचिव रूपेश पटेकर, विधानसभा अध्यक्ष विशाल मानकरी, दत्ता देवतरासे, राहुल जाधव, महिला अध्यक्षा अश्विनी बांगर, महिला सचिव सीमा बेलापुरकर आदी उपस्थित होते.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन

अयोध्या – हिंदुत्व व राम मंदिराचा मुद्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी अयोध्येमध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य यांच्यासहित डझनभर संत-महंत तसेच भाजपा व संघाचे...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : अमेरिकन अभिनेते स्टॅन लॉरेल

आज अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. १६ जुन १८९० साली झाला. साल १९२६पासून या जोडीने खरी...
Read More
post-image
देश विदेश

फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल

नवी दिल्ली – आज १६ जून फादर्स डे. या दिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमधून वडील आणि मुलामधलं निखळ नातं दाखविलं...
Read More