उस्मानाबादेत मनसेचे पोस्टर आंदोलन – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र

उस्मानाबादेत मनसेचे पोस्टर आंदोलन

उस्मानाबद – मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ‘केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक’ दुष्काळाची पाहणी करत आहे. मात्र उस्मानाबाद येथे गंभीर दुष्काळ  असूनसुद्धा ‘केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक’ उस्मानाबादेत फिरकलेच नाही, त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात ‘केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक’ दाखवा आणि बक्षीस मिळवा असे पोस्टर लावून मनसेने अनोखे आंदोलन केले. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून दुष्काळासाठी मदत जाहीर करावी अशी मागणी या आंदोलनादरम्यान केली.

उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र थोड्याफार प्रमाणात दुष्काळ पडल्याने पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा मोठा तुटवडा आहे, त्यामुळे जनावारांसोबत स्वत:च्या पोटाचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पण सरकारकडून आलेले ‘केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक’ याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष उस्मानाबादकडे वेधण्यासाठी मनसेने या अनोख्या आंदोलनाचा अवलंब केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More