‘कल्याणच्या पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान मोहीम नाही’, मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका – eNavakal
News महाराष्ट्र मुंबई

‘कल्याणच्या पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान मोहीम नाही’, मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

कल्याण –  कल्याणच्या पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान मोहीम नाही. त्यांनी इतर पुलांच्या कामांमध्ये लक्ष घालावं अशी टीका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. कल्याणमधील पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगला आदित्य ठाकरेंची उपस्थिती होती. त्यावर आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी टीका केली आहे. डोंबिवली हे आदित्य ठाकरे यांचे आजोळ आहे. त्यांनी इतर रखडलेल्या कामांमध्येही लक्ष घालावं असंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून कल्याणच्या पत्री पुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. आज या पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग करण्यात आले. यावेळी त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. मात्र आदित्य ठाकरेंच्या या उपस्थितीवर मनसेने टीका केली आहे.

पत्री पुलाला जोडणाऱ्या ९० फुटाच्या रस्त्याचा प्रश्नही अद्याप प्रलंबित आहे. कल्याणमधील पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगचं काम आज सुरु झालं आता पुढचे दोन दिवस हे काम चालणार आहे. या लाँचिंगच्या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीवर मनसेने टीका केली आहे.

“आदित्य ठाकरे हे गर्डर लाँचिंगसाठी कल्याणला आहे होते. त्यांनी केवळ पत्री पूल कामाची पाहणी न करता ठाकूर्ली ते माणकोली खाडी पूल, कोपर पूल, पलावा पूल, आंबिवली येथील रेल्वे उड्डाण पूल यांचीही कामं मार्गी लावावीत. पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान नाही”

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News महाराष्ट्र

अमरावतीत २२ शिक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह

अमरावती – राज्यातील शेकडो शिक्षकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अमरावती जिल्ह्यात आज (21 नोव्हेंबर) दिवसभरात 4 हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 22 शिक्षकांचा...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

‘कल्याणच्या पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान मोहीम नाही’, मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

कल्याण –  कल्याणच्या पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान मोहीम नाही. त्यांनी इतर पुलांच्या कामांमध्ये लक्ष घालावं अशी टीका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता; ऊर्जा राज्यमंत्र्यांचा दावा

अहमदनगर – 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता; असा दावा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनुपरे यांनी केला आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी...
Read More
post-image
News Uncategoriz महाराष्ट्र मुंबई

ठाणे – पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला आळा घाला, अब्दुल सत्तार

मुंबई – ठाणे व पालघर जिल्ह्यातील अवैध वाळू उपश्याला त्वरित आळा घालून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या गुन्हे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

घरात गांजा सापडल्याने विनोदवीर भारती सिंहला एनसबीकडून अटक

मुंबई – हिंदी विश्वातील विनोदवीर भारती सिंहला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. एनसीबी अर्थात अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. शनिवारी...
Read More