#MeToo मॉडेल पूजा मिश्राचा सलमान खानवर मानसिक छळाचा आरोप – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

#MeToo मॉडेल पूजा मिश्राचा सलमान खानवर मानसिक छळाचा आरोप

मुंबई -#MeToo अभियांतर्गत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी गैरवर्तवणूक, लैंगिक अत्याचाराबाबत खुलेपणाने बोलण्यास सुरूवात केली आहे. अभिनेत्री तनुश्री दत्तानंतर आता मॉडेल, अभिनेत्री पूजा मिश्राने सलमान खानवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. सलमानचे एका अभिनेत्रीशी लैंगिक संबंध असल्याचा सनसनाटी दावाही तिने केला आहे.

दोन वर्षांपूर्वीच पूजा मिश्राने सलमान खान, शत्रुघ्न सिंह आणि त्यांच्या परिवारावर आरोप केले होते. तसेच सलमान खान विरोधात बलात्कार केल्याची एफआयआर देखील पोलिस स्थानकात दाखल केली होती. ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी तीन व्हिडीओग्राफर्सने तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार तिने दाखल केली होती. आणखी प्रसिद्धीत येण्यासाठी तिने सलमान खानवर सुद्धा गंभीर आरोप केले होते. सलमान खान, शत्रुघ्न सिंह आणि पूनम सिंह यांच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआरचा फोटो तिने फेसबुकवर पोस्ट केला होता. यानंतर पूजाला शिजोफ्रेनिया हा मानसिक आजार असल्याची बातमी आली होती.

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

के. चंद्रशेखर राव उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता

हैदराबाद – तेलंगणामध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव उद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

#ElectionResults2018 कोण होईल मुख्यमंत्री?

नवी दिल्ली – मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या पाच राज्यांपैकी फक्त तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

लोणावळ्याची ‘मगनलाल’ चिक्की बंद होणार ?

लोणावळा – लोणावळ्याच्या प्रसिद्ध चिक्कीचे उत्पादक असलेल्या ‘मगनलाल’ चिक्कीला अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला आहे.  ‘मगनलाल’ चिक्की पैकी एक ‘मगनलाल फूड प्रोडक्ट्स’ या कंपनीला...
Read More
post-image
महाराष्ट्र

खासदार राजेंद्र गावितांना शिवीगाळ; ५ जणांना अटक

पालघर – पालघरचे भाजप खासदार राजेंद्र गावित सकाळी जॉगर्स पार्कला मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना काही अज्ञातांनी शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. गावितांच्या तक्रारीवरून पोलिसांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात हुडहुडी वाढली

महाबळेश्वर – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारठा वाढला आहे. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना गुलाबी थंडी अनुभवायला मिळाली आहे. महाबळेश्वमधील वेण्णा लेक येथे तापमानात घट झाल्यामुळे दवबिंदू बघायला मिळाले...
Read More