#MeToo फोटो जर्नलिस्टनंतर गायिका सोना मोहापात्राचे कैलाश खेरवर आरोप – eNavakal
देश मनोरंजन

#MeToo फोटो जर्नलिस्टनंतर गायिका सोना मोहापात्राचे कैलाश खेरवर आरोप

नवी दिल्ली – बॉलिवुडमध्ये #MeToo अंतर्गत तनुश्री दत्ताने आरोप केळुंनंतर काही दिवसांपासून इतर महिलांनी देखील आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल बोलायला सुरुवात केली आहे. विकास बहलवर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर गायक कैलाश खेरवरही गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला. एका फोटो जर्नलिस्टने गायक कैलाश खेरवर गैरवर्तनाचा आरोप केला होता. त्यानंतर आता पार्श्वगायिका सोना मोहापात्रानेही कैलास खेरवर आरोप केले आहेत.

‘एका मुलाखतीदरम्यान कैलाश खेर माझ्या आणि माझ्या जर्नलिस्ट मैत्रिणीच्या मध्ये बसला होता व त्याचे हात सारखे आमच्या मांड्यांवरून फिरत होते,’ असा खुलासा या फोटो जर्नलिस्टने केला होता. पण हे प्रकरण इथेच संपलेले नाही. कारण आता सुप्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा हिने कैलाश खेरवर गंभीर आरोप केले आहेत. आम्ही दोघे एका कार्यक्रमाच्या चर्चेसाठी पृथ्वी कॅफेमध्ये भेटलो होतो. त्यावेळी चर्चा सुरु असताना त्यांनी माझ्या मांडीवर हात ठेवला. तसेच तू खूप सुंदर असून तुझ्या नवरा नशीबवान आहे. तू एका अभिनेत्यापेक्षा एक संगीतकाराची जोडीदार म्हणून निवड केली, असे कैलाश खेर म्हणाल्याचे सोनाने म्हटले. इतकचं नव्हे  त्यांनी आयोजकांच्या मार्फत माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, अजून किती महिलांची माफी मागाल? जर आता माफी मागायला सुरुवात केली तर आयुष्य कमी पडेल, असे सोनाने ट्विटरवर लिहिले आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीत भ्रष्टाचार-निलेश राणे

रत्नागिरी – रविवारी मुंबईत निघालेल्या म्हाडाच्या लॉटरीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. याबाबत आपण कोर्टात जाणार असल्याचेही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

क्वीन कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा ट्रेलर प्रदर्शित

नवी दिल्ली – बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतच्या बहुप्रतीक्षित ‘मणिकर्णिका; द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सध्या ते पुण्यात दाखल झाले आहेत. थोड्याचवेळात पुण्यातील मेट्रो ३ चे भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात येणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

#IPLAuction2019 आयपीएलच्या लिलावास सुरुवात

जयपूर – पुढील वर्षी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या(आयपीएल) लिलावास सुरुवात झाली आहे. जयपूर येथील हा लिलाव पार पडत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्याच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

कल्याणकरांकडून मोदींसाठी गाजराचे तोरण

कल्याण – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन झाले. एकीकडे भूमिपूजनासाठी येणाऱ्या मोदींच्या स्वागतासाठी भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात...
Read More