#MeToo जयाप्रदांनी तक्रार केली तर आझम खान तुरुंगात जातील – अमरसिंह – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

#MeToo जयाप्रदांनी तक्रार केली तर आझम खान तुरुंगात जातील – अमरसिंह

नवी दिल्ली – राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांनी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सध्या देशात ‘मी टू’ मोहीम सुरू आहे, या मोहीमेअंतर्गत जयाप्रदा पोलिसांत तक्रार दाखल करण्यास गेल्या तर आझम खान तुरुंगात जातील, असे वक्तव्य अमरसिंह यांनी केले आहे.

राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांनी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या विरोधात एफआयआर यात्रा काढली आहे. आझम खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अमरसिंह पूर्ण प्रयत्न करत आहेत. एका मुलाखतीत बोलताना आझम खान यांनी ‘आपल्याला ठार मारणार व आपल्या मुलींवर अॅसिड हल्ला करणार असे वक्तव्य केले होते’, असा दावा अमरसिंह यांनी केला आहे. त्यामुळे ते आझम खान यांच्यावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाही आहेत.

दरम्यान, इंधन दरवाढीविषयी बोलताना अमरसिंह म्हणाले, इंधनाविषयी सामान्य नागरिकांना फार चिंता आहे. मात्र इंधन पंतप्रधान मोदींच्या घरी नसतं, ते बाहेरून विकत घ्यावं लागतं. जर जीवनच सुरुक्षित नसेल तर लोक इंधनाचं करणार तरी काय? निदान मोदींच्या सत्तेत देशातील मुली-स्त्रिया सुरक्षित आहेत. तसेच ‘ज्यावेळी हिंदू मुलींवर अत्याचार झाले त्यावेळी आझम खानसारख्या लोकांनी पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्यापासून थांबवलं, असं म्हणत अमरसिंह यांनी सांगितले, ‘मी मुस्लिमांच्या विरोधात नाही, आम्ही स्वातंत्र्य काळातील नेते अशफाक उल्लाह खान, अब्दुल हमीद आणि डॉ. अब्दुल कलाम यांचा सन्मान करतो पण आमचा त्या मुस्लिमांना विरोध आहे जे राहतात इथे आणि प्रशंसा पाकिस्तानची करतात.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २२ तारखेला मुंबईत; युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा २२ सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र हवामान

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी पण अतिवृष्टी नाहीच

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार...
Read More
post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पवारांची मानसिकताच राजेशाही – मुख्यमंत्र्यांची टीका

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 5 वर्षांच्या कार्याचा थोडक्यात आढावा...
Read More