#Metoo क्रिकेटर मलिंगावर लैगिक शोषणाचा आरोप – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

#Metoo क्रिकेटर मलिंगावर लैगिक शोषणाचा आरोप

मुंबई – श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगापाठोपाठ क्रिकेटपटू लसिथ मलिंगावरही लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. पार्श्वगायिका चिन्मयी श्रीपदा यांनी एका निनावी महिलेची पोस्ट शेअर करत या निनावी महिलेशी मलिंगाने अतिप्रसंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चिन्मयी श्रीपदा यांनी ट्विटरवरून या महिलेची पोस्ट शेअर करत तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. या पोस्टमध्ये ही महिला म्हणते की, मी माझी ओळख सांगू इच्छित नाही. काही वर्षांपूर्वी आयपीएलच्या सामन्याच्यावेळी मी माझ्या एका मैत्रिणीला मुंबईतील एका हॉटेलात शोधत होते. तिथे मलिंगा उतरला होता. मलिंगाने मला माझी मैत्रिण त्याच्या रुममध्ये असल्याचं सांगितलं. त्याचं मला आश्चर्य वाटलं. मी त्याच्या रुममध्ये माझ्या मैत्रिणीला शोधण्याचा प्रयत्न केला. तिथे माझी मैत्रिण सापडली नाही. त्याचवेळी मलिंगाने मला जबरदस्ती बेडवर ढकलले आणि माझ्याशी अतिप्रसंग करण्यास सुरुवात केली. मी त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पण त्यात अयशस्वी ठरले. माझ्यासोबत जबरदस्ती केली जात असतानाच अचानक रुमची बेल वाजली. हॉटेलचा स्टाफ काही कामानिमित्त आत आला. त्या संधीचा फायदा घेत मी तात्काळ वॉशरुममध्ये जाऊन तोंड धुतले आणि तिथून पळ काढला. लोक या पोस्टवर विश्वास ठेवणार नाहीत. कारण मलिंगा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे आणि मीच त्याच्याकडे जाणूनबुजून गेली असेल असं लोकांना वाटेल. हे मला माहीत आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका

मुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....
Read More
post-image
News देश

एम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप! महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड

नवी दिल्ली-  लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...
Read More
post-image
News मुंबई

नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण

मुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर

ग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...
Read More
post-image
News मुंबई

पुणे होर्डिंग दुर्घटना! सर्व यंत्रणांना प्रतिवादी करण्याचे कोर्टाचे आदेश

मुंबई- पुण्यात शनिवार वाड्याजवळील जुनाबाजार परिसरात होर्डिंगचा खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक यांच्या खंडपीठाने...
Read More