#MeToo एम जे अकबर यांचा राजीनामा – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

#MeToo एम जे अकबर यांचा राजीनामा

नवी दिल्ली -लैंगिक शोषणाचा आरोप झालेले परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी अखेर आपल्या परराष्ट्र राज्य मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता आरोपांविरोधातील लढाई कोर्टात लढणार असल्याचे अकबर यांनी सांगितले. माझ्यावर असणारे आरोप हे खोटे आहेत. कोर्टात मला न्याय मिळेल, असेही अकबर यांनी म्हटले आहे.

एम.जे. अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या आरोपांचे अकबर यांनी परदेश दौर्‍यावरून परतल्यानंतर खंडन केले होते. हे आरोप बिनबुडाचे असल्याचे अकबर म्हणाले होते. आज रमानी यांच्या पाठिशी 20 महिला पत्रकार उभ्या राहिल्या. दिल्ली कोर्टात या 20 महिला पत्रकारांनी अकबर यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर लगेचच अकबर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
आपल्या पदाचा राजीनामा देताना केलेल्या निवेदनात अकबर म्हणाले की,  माझ्यावर झालेल्या आरोपाविरोधात मी माझी बाजू व्यक्तिगतरित्या न्यायालयात मांडणार आहे. त्यासाठी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री या पदावरून पायउतार होणे संयुक्तिक असल्याचे मला वाटले. माझ्या करण्यात आलेल्या खोट्या आरोपांविरोधात मी आता एक व्यक्ती म्हणून लढणार आहे. याच कारणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. मला देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचा आभारी आहे.’

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

औरंगाबादमधील तलावात बुडून एकाचा मृत्यू

औरंगाबाद – तलावात पोहण्यासाठी आलेल्या तीन युवकांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबादमधील कागजीपुरा आज दुपारी घटना घडली. नसीम खान मुबीन...
Read More
post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेत भारताला चांगला खेळ करावा लागेल-राहुल द्रविड

मुंबई – आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळवायचे असेल तर भारताला चांगला खेळ करावाच लागेल, असे भारताचा माजी कर्णधार आणि जुनिअर भारतीय संघाचे मुख्य...
Read More
post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More