मायावतींचा काँग्रेसला पाठिंबा – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मायावतींचा काँग्रेसला पाठिंबा

नवी दिल्ली – बसपा अध्यक्षा मायावती यांनी सकाळी साडेदहा वाजता पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केला. मायावती पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, आम्ही स्वबळावर निवडणूक लढलो. आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही, आमच्या आमदारांचे म्हणणे आहे की, भाजपाला हरवायचेच असे जनतेने ठरविले होते. त्यामुळे हृदयावर दगड ठेवून जनतेने काँग्रेसचा पर्याय निवडला.

आमच्या उमेदवारांनी भाजपा व काँग्रेस दोघांशी संघर्ष करून चांगले मतदान मिळविले. दुर्दैवाने त्यांना विजय प्राप्त झाला नाही. उपेक्षित वर्गाची काँग्रेस व भाजपा दोन्ही पक्षांनी उपेक्षा केली. काँग्रेसच्या शासनात न्याय मिळाला नाही म्हणून आम्हाला बसपा पक्ष स्थापन करावा लागला. काँग्रेसनी न्याय दिला असता तर भाजपाला संधी मिळाली नसती. आगामी लोकसभा निवडणुकीत आतापासून कामाला लागा असे आवाहन करते. आम्ही भाजपाला सत्तेपासून दूर राखण्यासाठी निवडणूक लढलो होतो. आताही भाजपा तोडमोडीचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मप्रमध्ये आम्ही काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानला आवश्यकता असल्यास तिथेही समर्थन देऊ. छत्तीसगडला अजित जोगींनी एक वाक्य उच्चारले त्याचा संबंध प्रसारमाध्यमांनी भाजपाशी लावला. त्यामुळे जनता संभ्रमित झाली आणि याचा फायदा काँग्रेसने घेतला.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More