नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार ‘झिम्मा’ – eNavakal
मनोरंजन

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार ‘झिम्मा’

मागील संपूर्ण वर्ष लॉकडाऊनच्या सावटाखाली काढल्यानंतर आता हळूहळू सर्वत्र ‘न्यू नॉर्मल’ होऊन जीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, हॉटेल्स, मॉल्स सुरु झाल्यानंतर आता सिनेसृष्टीही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नव्या जोमाने सज्ज झाली आहे. अनेक नवनवीन चित्रपटांची घोषणा होत असतानाच, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे. खरं तर ‘झिम्मा’ नावाचा चित्रपट येत असल्याची आधीपासूनच चर्चा होती मात्र यात कलाकार कोण असणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर या चित्रपटातील कलाकार आपल्या समोर आले असून यात चित्रपटसृष्टी, रंगमंच, टेलिव्हिजन गाजवणारे कलाकार पाहायला मिळणार आहेत. यात सोनाली कुलकर्णी, क्षिती जोग, सुहास जोशी, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत या कसलेल्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनलॉकनंतर प्रदर्शित होणारा हा पहिला मोठा मराठी सिनेमा आहे.

‘नव्या वर्षात खेळू आनंदाचा खेळ’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचे पोस्टरच इतके कमाल आहे. पोस्टरमधील स्टारकास्ट पाहता ‘झिम्मा’ झकास आणि कौटुंबिक मनोरंजन करणारा असणार हे नक्की! पोस्टरवर असलेल्या वेगवेगळ्या वयोगटातील अभिनेत्रींमध्ये सिद्धार्थ एकमेव तरुण अभिनेता आहे. त्यामुळे ‘झिम्मा’मध्ये काहीतरी ट्विस्ट असणार याचा अंदाज येतोय. ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांचे असून चित्रपटाला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. क्षिती जोग, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपम मिश्रा आणि स्वाती खोपकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. दरम्यान, हेमंत ढोमे यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच धमाल चित्रपट दिले. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक संदेशही दिला त्यामुळे आता ‘झिम्मा’मध्ये काय असणार यासाठी मात्र २३ एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार ‘झिम्मा’

मागील संपूर्ण वर्ष लॉकडाऊनच्या सावटाखाली काढल्यानंतर आता हळूहळू सर्वत्र ‘न्यू नॉर्मल’ होऊन जीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, हॉटेल्स, मॉल्स सुरु झाल्यानंतर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#INDvsENG: 117 चेंडूमंध्ये 2 षटकार आणि 13 चौकार; रिषभ पंतने भारताचा डाव सावरला

नव्याने उभारण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या वहिल्या कसोटी सामन्यामध्ये खेळपट्टीने आपली कमाल दाखवत भारत आणि इंग्लंडमधला तिसरा कसोटी सामना अवघ्या २...
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवा’, फडणवीसांच

मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅन्टिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकाने भरलेली कार सापडली होती. याप्रकरणावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप...
Read More
post-image
पर्यावरण महाराष्ट्र मुंबई

जागतिक महिला दिनी जाणून घेऊया नदीला वाचवणाऱ्या पाच असामान्य स्त्रियांचे कर्तुत्व

मुंबई – आपल्याला पिण्यायोग्य पाण्याचा सर्वात मोठा उपलब्ध स्रोत म्हणजे नदी. पण हल्ली नदी प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. मात्र, आपल्यातल्या नदीपरी असणाऱ्या काही स्त्रिया...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

खळबळजनक! अंबानीच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीच्या मालकाचा सापडला मृतदेह

ठाणे – उद्योगपती मुकेश अँबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली बॅग सापडल्यानंतर अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आज ज्या गाडीत स्फोटके सापडली त्या...
Read More