लॉकडाऊनमध्येही सायली संजीवच्या चित्रपटाचं टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित – eNavakal
मनोरंजन

लॉकडाऊनमध्येही सायली संजीवच्या चित्रपटाचं टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय ठप्प झाले असून लॉकडाऊनचा परिणाम मनोरंजन विश्वावरही झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांत कोणत्याच मालिका, चित्रपट, वेबसिरीजचे चित्रिकरण झाले नसल्याने अनेक निर्माते चिंतेत आहेत. अशातच, अभिनेत्री सायली संजीव हिच्या गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शिक करण्यात आला आहे.

प्रत्येकाच्या मनात काही स्वप्नं असतात. काही साधी सोपी, तर काही कठीण परीक्षा घेणारी. कधी ही स्वप्नं पूर्ण होतात आणि भरपूर समाधान देतात. तर कधी काही स्वप्नं अपूर्ण राहतात आणि मनाचा तळ ढवळून टाकणारी अस्वस्थता देतात. पण आशा निराशेने सजलेला हा स्वप्नांचा पाठलाग फार सुंदर असतो. एखाद्या पैठणी सारखा.. रंगीत, तलम, मुलायम.. नायिकेच्या मनातल्या अशाच गोजिऱ्या स्वप्नांचा प्रवास ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.म या चित्रपटाचा तरल असा टीझर नुकताच सोशल मीडियाद्वारे सादर करण्यात आला.

प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शन पैठणीची निर्मिती करत आहेत. अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी आदी कलाकार आपल्या भेटीस येणार असून अन्य कलाकार मंडळींची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

पैठणी म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी हळवा कोपरा असतो. टीझरमधून पैठणीच्या स्वप्नाची झलक दिसत असून, त्यामुळे हा टीझर समस्त महिला वर्गाच्या नक्कीच पसंतीला उतरेल यात शंका नाही.

लवकरच आता हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप, भरारी पथके नेमण्याचे आदेश

मुंबई – राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत २३९  नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज २३९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ३२७  जणांना गेल्या २४...
Read More
post-image
मुंबई

९८ वर्षांच्या आजोबांनी १९ दिवसांत केली कोरोनावर मात

मुंबई – देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आहेत. देशात ६० वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे कोरोनामुळे सर्वाधिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी मुंबई पालिकेची नवी नियमावली, घरातच सक्तीने राहावं लागणार क्वारंटाइन

मुंबई – देशातील विविध राज्यातून मुंबईत परप्रांतीयांचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळे मुंबई पालिकेने बाहेरून येणाऱ्यांसाठी नवे नियम तयार केले आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना...
Read More
post-image
मनोरंजन

ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कागदपत्रे घेऊन पुन्हा कार्यालयात दाखल

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे. ईडीच्या चार अधिकाऱ्यांकडून गेल्या काही तासांपासून रियाची चौकशी सुरु आहे. ईडी कार्यालयात...
Read More