प्रसिद्ध नाट्य निर्माते गोविंद चव्हाण यांचे निधन – eNavakal
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

प्रसिद्ध नाट्य निर्माते गोविंद चव्हाण यांचे निधन

मुंबई- मदर्स डे, वन रूम कीचन, दुधावरची साय, चाॅईस इज युवर्स, यू टर्न, हिमालयाची सावली अशा काही नाटकांची निर्मिती करणारे प्रसिद्ध नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचे आज सकाळी ब्रेन हॅमरेजने बोरिवली येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी तसेच एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने नाट्य सृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे.

गोविंद चव्हाण हे बोरिवली येथे राहत होते. काल दुपारी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मात्र आज सकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांचे निधन झाले, अशी माहिती हिमालयाची सावली या नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी दिली. अत्यंत मनमिळावू आणि सतत हसरा चेहरा असणारे गोविंद चव्हाण यांनी अनेकांना मदतही केली आहे. यू टर्न हे आनंद म्हसवेकर लिखित व दिग्दर्शित त्यांचे नाटक कमालीचे गाजले होते. सध्या रंगभूमीवर त्यांची निर्मिती असलेले हिमालयाची सावली हे नाटक चांगले गाजत होते. अभिनेता शरद पोंक्षे यांनी या नाटकामध्ये मुख्य भूमिका केली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मुंबई

९८ वर्षांच्या आजोबांनी १९ दिवसांत केली कोरोनावर मात

मुंबई – देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आहेत. देशात ६० वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे कोरोनामुळे सर्वाधिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी मुंबई पालिकेची नवी नियमावली, घरातच सक्तीने राहावं लागणार क्वारंटाइन

मुंबई – देशातील विविध राज्यातून मुंबईत परप्रांतीयांचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळे मुंबई पालिकेने बाहेरून येणाऱ्यांसाठी नवे नियम तयार केले आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना...
Read More
post-image
मनोरंजन

ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कागदपत्रे घेऊन पुन्हा कार्यालयात दाखल

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे. ईडीच्या चार अधिकाऱ्यांकडून गेल्या काही तासांपासून रियाची चौकशी सुरु आहे. ईडी कार्यालयात...
Read More
post-image
महाराष्ट्र

तपासणी नाका टाळण्यासाठी गोदावरी पात्रातून जीवघेणा प्रवास

परभणी – परभणीच्या पाथरीतून बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे जाण्यासाठी, पाथरीमधील नागरिक तपासणी नाका टाळून थेट गोदावरी नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करत असल्याची बाब समोर आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशातील पहिली ‘किसान रेल’ साप्ताहिक देवळाली – दानापूर दरम्यान सुरू

नवी दिल्ली – केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात किसान रेल चालवण्याची घोषणा केली होती. मोदी सरकारचे हे वचन आज पूर्ण झाले. आता देशातील शेतकरी...
Read More