#MarathaMorcha जालनामध्ये आंदोलनाची धग कायम – eNavakal
News महाराष्ट्र

#MarathaMorcha जालनामध्ये आंदोलनाची धग कायम

जालना – जालना जिल्ह्यात आज ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन आयोजित केले आहे. जिल्ह्यातील आसई फाटा आणि जाफ्राबाद शहरात चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झाली असून रस्त्यावर टायर जाळून चक्का जाम करण्यात आला. यामुळे जालना शहर आणि भोकरदनकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.  परिणामी या विभागातील बससेवादेखील विस्कळीत झाली आहे. एसटी महामंडळाच्या बसचे नुकसान होऊ नये म्हणून भोकरदन, जाफ्राबाद आणि राजूरसह इतर बस स्थानकातून एकही बस सोडण्यात आलेली नाही. तसेच  बदनापूर, जालना, परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी या ठिकाणाची परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More