#Marathamorchaआंदोलनात मेल्यानंतर मदत देण्यापेक्षा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा – eNavakal
News आघाडीच्या बातम्या

#Marathamorchaआंदोलनात मेल्यानंतर मदत देण्यापेक्षा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा

नाशिक – मुख्यमंत्र्यानी मराठा समाजावर केलेले आरोप मागे घ्यावेत. आंदोलनात जीव गेल्यावर मदत देण्यापेक्षा आंदोलक जिवंत असतांनाच शासनाने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आदी मागण्या करत यापुढे सरकारच्या भूलथापांना बळी न पडण्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केला आहे. उदया बुधवारी जिल्हा बंद ठेवण्याचा निर्णय झाला असून बैठकीस एकही लोकप्रतिनिधी उपस्थित न राहिल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला.

काल औरंगाबाद येथील जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदे या तरुणांचा अंत झाल्याने आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी वरदलक्ष्मी लॉन्सवर आयोजित केलेल्या बैठकीत वरील निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी राजू देसले, करण गायकर, कैलास खर्जुल, आर.डी. धोंगडे आदी मान्यंवर उपस्थित होते. अमर रहे -अमर रहे, काकासाहेब शिंदे अमर रहे….एक मराठा -लाख मराठा आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.
शासनाने यापूर्वी मराठा समाजाविषयी केलेल्या घोषणा फसव्या होत्या.त्यातून समाजाची मोठी फसवणूक झाली आहे.मात्र यापुढे सरकारच्या भूलथापांना बळी न पडण्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरला जाण्यापासून रोखल्याने त्यांनी समाजाच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्याने बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला. वारीत साप सोडायला मराठा समाज हिजडा आहे का असा संतप्त सवाल करत आंदोलकांनी मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More
post-image
News मुंबई

सांताक्रुझमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर! पालिकेची डोळेझाक

मुंबई – राज्य सरकारने 23 जूनपासून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरांवर बंदी लागू केल्यानंतरही सांताक्रुझ (पुर्व) भागातील फेरीवाले व काही दुकानदार प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करताना...
Read More
post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More