मोदींच्या शपथविधीला ममता बॅनर्जी जाणार नाहीत – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

मोदींच्या शपथविधीला ममता बॅनर्जी जाणार नाहीत

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी उद्या मोदींच्या शपथविधीला दिल्लीत हजर राहणार होत्या. मात्र पश्‍चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारात तृणमूलकडून मारल्या गेलेल्या 54 कार्यकर्त्यांच्या  कुटुंबियांना आमंत्रित केले आहे, असे भाजपाने जाहीर केले. भाजपाच्या या राजकारणाने ममता बॅनर्जी संतापल्या व म्हणाल्या की, पंतप्रधानपदाच्या शपथविधीसारख्या पवित्र समारंभाचा मोदी राजकारणासाठी उपयोग करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी या शपथविधीला जाण्याचा विचार रद्द केला आहे. त्यांनी नरेेंद्र मोदी यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, अभिनंदन, नवे पंतप्रधान नरेेंद्र मोदीजी! खरे म्हणजे या शपथविधीला हजर राहण्याची माझी योजना होती. त्यासाठी मी हे घटनात्मक आमंत्रण स्वीकारले होते. मात्र मला काही तासांपूर्वीच कळले आहे की, तुम्ही पश्‍चिम बंगालमध्ये प्रचारादरम्यान झालेल्या दंगलीत मारल्या गेलेल्या 54 भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रित केल्याचे म्हटले आहे. हे 54 जण राजकीय कारणाने मारले गेले हे पूर्णपणे असत्य आहे. हे मृत्यू वैयक्तिक वैमनस्यातून व इतर कारणांनी घडले आहेत. राजकारणाशी याचा काहीही संबंध नाही. मात्र त्या मृत्यूचा तुम्ही माझ्याशी उट्टे काढण्यासाठी उपयोग केला. मोेदीजी कृपया मला माफ करा. अशा शुद्र राजकारण चालणार्‍या ठिकाणी मी येणार नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा

मुंबई – राज्यात विशेषत: मुंबईत सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे. राज्यात अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची कमतरता नसून मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे....
Read More
post-image
मुंबई

शेअर बाजारात तेजी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असलेल्या मुंबई शेअर बाजारात आज सकाळपासूनच तेजीचे वातावरण आहे. त्यात बँकांच्या समभागात तेजी आल्यामुळे मुंबई शेअर...
Read More
post-image
महाराष्ट्र

मालेगावातील पावरलूम मालकांवर गुन्हे दाखल

नाशिक – राज्यातच नाही तर नाशिक जिल्ह्यातही सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना मालेगावात अनेक पावरलूम सुरूच होते. मात्र अखेर पाच पॉवरलूम मालकांवर गुन्हे दाखल...
Read More
post-image
महाराष्ट्र

घाटी रुग्णालयात डॉक्टर परिचारिकांचे स्क्रीनिंग सुरू

औरंगाबाद – औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या निवासी डॉक्टर आणि परिचारिकांची स्क्रिनिंग घाटी रुग्णालयात करण्यात येत आहे. कोरोनाच्या 3...
Read More
post-image
देश विदेश

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस यांची प्रकृती खालावली, पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस

लंडन – १० दिवसांपूर्वी बोरिस यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर नियमित चाचणीसाठी त्यांना रुग्णालयात नेले असता प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात हलवण्यात...
Read More