मै पल दो पल का शायर हूँ…! माही निवृत्त – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

मै पल दो पल का शायर हूँ…! माही निवृत्त

नवी दिल्ली – गेल्या एक वर्षाहून अधिक काळ क्रिकेटप्रेमी महेंद्र सिंह धोनीची मैदानावर वाट पाहत होते. मात्र काल स्वातंत्र्य दिनी सायंकाळी अचानक त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. त्याच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

महेंद्रसिंह धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फोटो पोस्ट केले आहेत. या व्हिडीओला ‘मै पल दो पल का शायर हूँ’, हे गाणं शेअर करत धोनीने निवृत्तीची घोषणा केली. ‘तुम्ही दिलेलं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभारी आहे…1929 (म्हणजे संध्याकाळी 7.30) पासून मला निवृत्त समजावे’, असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे.

 

View this post on Instagram

 

Thanks a lot for ur love and support throughout.from 1929 hrs consider me as Retired

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

याआधी धोनीने कसोटी क्रिकेटमधून २०१४ साली निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो विराटच्या नेतृत्त्वाखाली संघात एक सिनिअर खेळाडू म्हणून जबाबदारी पार पाडत होता. मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनीला संघाला विजय मिळवून देता आला नाही. तेव्हापासून तो पुन्हा मैदानावर दिसला नाही. गेल्या वर्षभरात अनेकवेळा धोनीच्या निवृत्तीची बातमी आली परंतु धोनीने त्यावर कधीच भाष्य केले नाही. दरम्यान, धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्यामुळे अचानक निवृत्ती जाहीर करुन धक्का बसलेल्या चाहत्यांना हा थोडासा दिलासा म्हणावा लागेल.

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेल्या धोनीने २००४ साली बांगलादेशविरुद्ध वनडेत पदार्पण केले होते. धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघाने अनेक सामने जिंकले आहेत. 2008 ते 2014 दरम्यान धोनी कसोटी सामन्यांचा कर्णधार होता. त्याने 2007 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत टी-20 ट्रॉफी जिंकली होती. 2010 आणि 2016 साली त्याने आशिया कप जिंकला आहे. 2011 साली त्याच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकली होती. धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि सर्वोत्तम फिनिशर बनला.

महेंद्रसिंह धोनीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी झाला. 39 वर्षीयधोनीने भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर पोहोचवले. त्याने तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळली. धोनीने भारतीय संघाकडून ३५० वनडे सामन्यात १० हजार ७७३ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५०.६ इतकी आहे. यात १० शतक आणि ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ९० कसोटीत ३८.१च्या सरासरीने धोनीने ४ हजार ८७६ धावा केल्या आहेत. टी-२०त धोनीने भारताकडून ९८ सामने खेळले असून यात त्याने ३७.६च्या सरासरीने १ हजार ६१७ धावा केल्या आहेत. धोनीला ‘कॅप्टन कूल’ म्हणून संबोधले जाते. तसेच माही या नावानेही ओळखले जाते. महिने ज्याप्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला, त्यावरून तो सर्वोत्तम फिनिशर असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

मै पल दो पल का शायर हूँ…! माही निवृत्त

नवी दिल्ली – गेल्या एक वर्षाहून अधिक काळ क्रिकेटप्रेमी महेंद्र सिंह धोनीची मैदानावर वाट पाहत होते. मात्र काल स्वातंत्र्य दिनी सायंकाळी अचानक त्याने आंतरराष्ट्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत १,२५४, पुण्यात २,४३२ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ८४ हजार ७५४ वर

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात १२ हजार ६१४ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर ३२२ मृत्यूंची नोंद झाली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खासदार नवनीत राणा यांची प्रकृती स्थिर, आयसीयूतून सामान्य कक्षात हलवले

मुंबई- कोरोनाचा संसर्ग झाल्याने लिलावती रुग्णालयात उपचार घेत आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांना आयसीयूतून सामान्य कक्षात हलवण्यात आले आहे. प्रकृतीत थोडी सुधारणा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पाकिस्तानची वेबसाईट हॅक, भारताचा तिरंगा फडकला

नवी दिल्ली- आज देशात स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी पाकिस्तानच्या वेबसाइट्सवरही शुभेच्छांचे संदेश दिसून आले आहेत. पाकिस्तानच्या फातिमा जिन्ना महिला विद्यापीठासह...
Read More
post-image
विदेश

९० दिवसांत टिकटॉकच्या संपत्तीची विक्री करण्याचा डोनाल्ड ट्रम्पचा आदेश

न्यूयॉर्क – काही दिवसांपूर्वी अमेरिकेने सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घातली होती. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनी बाईटडान्सला ९० दिवसांत अमेरिकेतील टिकटॉकची...
Read More