#Maharashtrabandh १५ ऑगस्टपासून एकवेळ जेवणाचे आंदोलन – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन महाराष्ट्र

#Maharashtrabandh १५ ऑगस्टपासून एकवेळ जेवणाचे आंदोलन

औरंगाबाद – मराठा समाजाच्या ९ ऑगस्टच्या मोर्चावेळी औरंगाबादच्या वाळूज येथील औद्योगिक वसाहतीत प्रचंड तोडफोड झाली. वाळूज औद्योगिक वसाहतीतील ५० ते ६० कंपन्यांची कार्यालये फोडली, लुटालूट केली, मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे उद्योजकांनी नाराज होऊन आज आपले उद्योग एक दिवस बंद ठेवले.

यानंतर मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की, औद्योगिक वसाहतीचे नुकसान करणारे आमचे नाहीत. त्यांच्यावर कडक कारवाई करा. आम्ही त्यांना पाठीशी घालत नाही आणि यापुढे मराठा समाज स्वत: ला क्लेश करून घेणार असून १५ ऑगस्टपासून मराठा समाजाचे एक वेळचे  जेवणाचे आंदोलन सुरू होणार आहे.

औरंगाबाद, पुण्यातील हिंसेनंतर मराठा मोर्चाने ही घोषणा केली आहे. आंदोलनात काही बाहेरच्या शक्ती घुसल्या, समाजकंटक मोर्चात येतात त्यामुळे आता रस्त्यावर आंदोलन होणार नाही. मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यापुढे मागण्या मान्य होईपर्यंत साखळी उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. एमआयडीसी विध्वंसातील सीआयडी चौकशी करण्याची मागणी समितीकडून करण्यात येत आहे. मराठा आंदोलकांनी संयम ठेवण्याचे आवाहन समितीने केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

फेरीवाला धोरणाची काटेकोर अमंलबजावणी करा – राज ठाकरे

मुंबई – मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून  फेरीवाला धोरणाची आणि त्यातल्या नियमाची काटेकोर अमंलबजावणी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र...
Read More
post-image
लेख

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आज प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म २२ मार्च १९७२ साली झाला. अश्विनी एकबोटे माहेरच्या अश्विनी काटकर, त्यांनी बालपणी नंदनवन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा मुंबई

सचिन-विनोदची जोडी पुन्हा मैदानात

मुंबई – शालेय जीवनापासून ते भारतीय संघातील ‘जय-विरू’ म्हणजेच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही जोडी पुन्हा एकदा मैदानांवर एकत्र दिसणार आहे. अलीकडच्या काही वर्षात दोघांच्या मैत्रीमध्ये...
Read More