#Maharashtrabandh पुण्यात ‘बंद’ला हिंसक वळण – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन महाराष्ट्र

#Maharashtrabandh पुण्यात ‘बंद’ला हिंसक वळण

पुणे – पुण्यात बंदला हिंसक वळण प्राप्त झालं आहे. चांदणी चौक परिसरात पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. त्यामुळे आंदोलक अजूनच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यासमोर ठिय्या आंदोलन केला आहे. तसेच कार्यालयात तोडफोड देखील केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध हयात हॉटेल बंद पाडण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सर्व आंदोलकर्त्यांनी सकाळी राधा चौकात एकत्र येत तेथून शिवछत्रपती क्रिडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेंगलोर-पुणे-मुंबई महामार्गावर जवळपास एक तास ठिय्या आंदोलन केले. यादरम्यान महामार्गावरील संपुर्ण वाहतुक बंद करण्यात आली होती.

मराठा मोर्चातर्फे आज महाराष्ट्र बंद पाळण्यात येत असला तरी पुण्यातील काही आयटी कंपन्या सुरु आहेत. कोथरूडमधील आयटी कंपन्यांमध्ये आंदोलकांनी घुसून दमदाटी केल्याची घटना आज घडली आहे. कर्मचाऱ्यांना सोडा असे म्हणून आंदोलक सरळ कंपनीत घुसले आहेत. त्यामुळे आंदोलनाचा मोठा फटका आयटी क्षेत्राला आज बसला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More