#Maharashtrabandh कल्याण-डोंबिवलीत मराठा समाजाचे शांततेत ठिय्या आंदोलन – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र

#Maharashtrabandh कल्याण-डोंबिवलीत मराठा समाजाचे शांततेत ठिय्या आंदोलन

डोंबिवली – सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी कल्याण, डोंबिवली, आंबिवली, टिटवाळासह कल्याणच्या ग्रामीण भागात शांततेत धरणे आंदोलन करण्यात आले तर म्हारळ येथे सकाळी रास्ता रोको करण्यात आला. राज्यभरातील ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर बांदमधून वगळलेल्या कल्याण-डोंबिवली परिसरात जनजीवन, वाहतुक, व्यापार, शाळा सर्व सुरळीत होते.

कल्याण शहरात तहसीलदार कार्यालयासमोर डोंबिवलीत इंदिरा गांधी चौकात शासनाविरोधात घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले कौस्तुभ राणे यांच्यासह मराठा आंदोलनातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, टिटवाळा येथे पोलीस ठाण्याजवळ धरणे धरण्याचा निर्णय रद्द करीत तेथील कार्यकर्ते देखील कल्याण तहसीलदार कार्यालयासमोरील आंदोलनात सहभागी झाले. दुपारी सव्वादोनच्या सुमारास तहसीलदार अमित सानप यांना निवेदन देण्यात आले व त्यानंतर आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी कल्याण, आंबिवली, टिटवाळा व म्हारळ परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच डोंबिवली शहरातील कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौकात केलेले आंदोलन सायंकाळपर्यंत सुरु होते. कल्याण-डोंबिवली परिसरात सर्व जनजीवन सुरळीत सुरू होते. केडीएमटी बससह रिक्षा व अन्य खाजगी वाहतूक सुरु होती.

म्हारळमध्ये रास्तारोको…
सकाळी गर रस्त्यावर म्हारळ येथे मराठा कार्यकर्त्यांनी कल्याण-मुरबाड रस्त्यावर काहीकाळ चक्काजाम केला. नंतर तेथील कार्यकर्त्यांनी कल्याणच्या प्रेमआटोपर्यंत येथे दुचाकीवरून रॅलीने आले तेथून कल्याण तहसीलदार कार्यालयावर पायी मोर्चा काढला व तेथील आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच शिवसेना नेतृत्वाला अल्टीमेटम?

मुंबई – केंद्रात आणि राज्यात युतीत असलेल्या शिवसेनेने अनेकवेळा भाजपवर टीका करत एकला चलो रे, ची साद दिली आहे.  मात्र, आज भाजप पक्षश्रेष्ठीनीच शिवसेनेची कोंडी...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी – महादेव जानकर

नांदेड – उत्पन्न वाढीसाठी शेतीसह जोड व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांसह तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन,...
Read More
post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

फेरीवाला धोरणाची काटेकोर अमंलबजावणी करा – राज ठाकरे

मुंबई – मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून  फेरीवाला धोरणाची आणि त्यातल्या नियमाची काटेकोर अमंलबजावणी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र...
Read More