#Maharashtrabandh उद्योजकांच्या बैठकीत कंपन्यांमधून लूट केल्याचा आरोप – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र

#Maharashtrabandh उद्योजकांच्या बैठकीत कंपन्यांमधून लूट केल्याचा आरोप

औरंगाबाद – गुरुवारी महाराष्ट्र बंद दरम्यान वाळूज एमआयडीसीमधील साठहून अधिक कंपन्यांमध्ये तोडफोड करण्यात आली. त्यामुळे आज मराठवाडा ऑटो क्लस्टरमध्ये उद्योजकांची बैठक घेण्यात आली. तोडफोडीत कंपनीचे कोट्यवाधींचे नुकसान झाल्याचे उद्योजकांनी सांगितले आहे तर कंपन्यांमधून लूट केल्याचा गंभीर आरोप उद्योजकांनी केला आहे. आकार टूल्स कंपनीतून तब्बल १६ टन साहित्य लुटल्याचे उद्योजकांनी सांगितले आहे. ततसेच जोपर्यंत आम्हाला संरक्षण मिळणार नाही तोपर्यंत काम सुरू करणार नाही असा इशारा उद्योजकांनी दिला आहे.

तोडफोडीत सामील असलेल्या तरुणांना नोकऱ्या देऊ नका असे आवाहन उद्योजकांनी केले आहे. तसेच यापूर्वी झालेल्या यापूर्वी आंदोलनांमुळे कंपन्यांवर परिणाम झाला नाही मात्र यावेळी आंदोलनाचा केवळ परिणाम झाला नाही तर मोठा हल्ला झाला आहे, असे म्हणत उद्योजकांनी झुद्शाही करण्यास कोण प्रवृत्त करतंय ते शोधून गुन्हा दाखल करावा अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सोज्वळ अभिनेत्री उमा भेंडे

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३१ मे १९४५ साली कोल्हापूर येथे झाला. सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा भेंडे यांनी मराठी रसिक मनावर...
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरच्या सातपाटी परिसरात यंदा पापलेटच्या उत्पादनात घट

पालघर – राज्यासह जगभरात निर्यात होणार्‍या पालघरच्या सातपाटी परिसरातील पापलेट या मत्स्याच्या प्रकारामध्ये यंदा प्रचंड घट झाली आहे. पापलेटचे उत्पादन गेल्या हंगामापेक्षा 190 टनांनी घटले...
Read More
post-image
देश

मनोहर पर्रिकरांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद

पणजी – गोव्यामधील मिरामार बीचवर गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात...
Read More