घरगुती गणेशोत्सवावरही मर्यादा! राज्य सरकारने जारी केली मार्गदर्शक सूचना – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

घरगुती गणेशोत्सवावरही मर्यादा! राज्य सरकारने जारी केली मार्गदर्शक सूचना

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार अनेक गणेशमंडळांनी गणेशमूर्ती न बसवता आरोग्य उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. आता राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जाहीर केली असून यात घरगुती गणेशउत्सवावरही मर्यादा घालण्यात आली आहे. घरगुती गणपती २ फुटांपेक्षा मोठी नसावी असे नव्या नियमावलीत सांगण्यात आले आहे. तसेच, संसर्ग टाळण्यासाठी विसर्जन स्थळी जाण्यापेक्षा घरच्या घरी वा कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाचा – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मुंबई पालिकेकडून नियमावली जाहीर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील गणेशोत्सव मंडळासोबत बैठका घेतल्या होत्या. त्यात झालेल्या चर्चेनुसार राज्य सरकारनं उत्सवासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीच्या उंचीवर चार फुटांचे तर, घरगुती मूर्तीच्या उंचीवर दोन फुटांचे बंधन असेल.

सरकारच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत?

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिका व स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार आवश्यक परवानग्या घ्यावा लागतील

उत्सवाचे मंडप हे न्यायालयाचे आदेश आणि प्रशासनाच्या धोरणाशी सुसंगत असावे. सजावट करताना भपकेबाजी नसावी.

शक्यतो घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो घरीच करावे. ते शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे.

गणेशमूर्तींचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील विसर्जनावेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून विसर्जनाची गर्दी टाळता येईल व सर्वांनाच सुरक्षित राहता येईल.

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम किंवा रक्तदान शिबिरे घेण्यास प्राधान्य द्यावे.

आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम करताना गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन करावे.

श्रीगणेशाचे दर्शन ऑनलाइन, केबल, फेसबुक व वेबसाइटद्वारे करून देण्याची व्यवस्था करावी.

गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण व थर्मल स्क्रिनिंगची पुरेशी व्यवस्था करावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणारे भाविक मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे नियम पाळतील हे पाहावे.

गणेशाचे आगमन व विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येऊ नये. विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करावी.

राज्य सरकारच्या संबंधित विभागांनी तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं बंधनकारक राहील.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेली श्रुती मोदी नक्की कोण?

मुंबई – सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवनव्या लोकांची नावे समोर येत आहेत. त्यातच काल सीबीआयने सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यात श्रुती मोदी सध्या बरीच...
Read More
post-image
महाराष्ट्र

तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ऑगस्टपासून

मुंबई – शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक ) प्रथम वर्ष  पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश विदेश

गुड न्यूज! भारतात २०२१ साली विश्वचषक होणार

मुंबई – भारतामध्ये होणारा विश्वचषक वेळेनुसार २०२१ साली होणार आहे. आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. आयसीसीने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

आज राज्यात 10 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद, तर 300 मृत्यू

मुंबई – राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक असून आजदेखील १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १०...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप, भरारी पथके नेमण्याचे आदेश

मुंबई – राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात...
Read More