महाराष्ट्राने जेवू घातले, उत्तर प्रदेशने उपाशी ठेवले, स्थलांतरित मजुरांची व्यथा – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

महाराष्ट्राने जेवू घातले, उत्तर प्रदेशने उपाशी ठेवले, स्थलांतरित मजुरांची व्यथा

मुंबई – मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी निघालेल्या स्थलांतरित मजुरांची ट्रेन उशिरा धावत असून, कोणतीही सुविधा दिली जात नसल्याची तक्रार केली आहे. संतप्त मजूर रेल्वे ट्रॅकवर उतरले असून जबाबदारी घेण्याची मागणी करत आहेत. प्रवासात शिळे अन्न दिल्याची तक्रारही मजुरांनी केली आहे. पनवेलमधून उत्तर प्रदेशच्या जौनपूरसाठी निघालेली ट्रेन वाराणसी येथे १० तासांपासून अडकली होती. रात्री उशिरा संतप्त मजूर ट्रॅकवर उतरले होते. यावेळी समोरुन ट्रेन येत असतानाही मजूर हटण्यास तयार नव्हते. अखेर रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आणि त्यांच्या जेवणाची सोय केल्यानंतरच हे मजूर हटले. काही वेळाने ट्रेनचा पुढील प्रवास सुरु झाला. उत्तर प्रदेशातील कानपूर जंक्शन येथे देण्यात आलेले अन्न खराब होते अशी माहिती ट्रेनमधील मजुरांनी दिली आहे.

वाचा – ३५ लाख स्थलांतरीत मूळगावी परतले, आणखी २६०० ट्रेन श्रमिकांसाठी धावणार- रेल्वे मंत्रालय

आम्हाला महाराष्ट्रात अन्न मिळाले पण उत्तर प्रदेशात काहीच मिळाले नाही. आमची ट्रेन वाराणसीत सात तास थांबली होती. नंतर प्रवास सुरु झाला आणि पुन्हा दोन तासांसाठी थांबली. यानंतरही पुन्हा ट्रेन अडकली होती.

दरम्यान विशाखापट्टणम येथून बिहारसाठी निघालेली ट्रेन १० तासांपासून दीन दयाल उपाध्याय रेल्वे जंक्शनला थांबलेली होती. या ट्रेनमधील मजुरांनीही रेल्वे ट्रॅक अडवून धरला असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात घोषणा दिल्या. ट्रेन रात्री उशिरा ११ वाजता आली असून आम्ही तेव्हापासून इथेच अडकलो आहोत. आम्हाला गेल्या दोन दिवसांपासून अन्नही मिळालेले नाही. शुक्रवारी गुजरातमधून बिहारला जाणाऱ्या मजुरांनी उत्तर प्रदेशातील कानपूर जंक्शन येथे अन्न खराब असल्याचे सांगत फेकून दिले होते. अशी अमानवीय वागणूक का दिली जात आहे अशी विचारणाही मजुरांनी यावेळी तेथे उपस्थित पोलिसांना केली. कानपूरमध्ये एका मजुराने सांगितले की, ‘शौचालयांमध्येही पाणी नाही. पिण्याचे पाणी आम्ही कुठून आणू. जेवण्यासाठी देण्यात आलेली पुरी चार-पाच दिवसांपूर्वीची होती. त्यामुळे आम्ही ते अन्न फेकून दिले.’

वाचा – सिग्नल बिघाडामुळे २० श्रमिक स्पेशल रेल्वे रखडल्या, मजुरांचे हाल

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लॉकडाउन 4.0 : आता पुढे काय करणार? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली – देशात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. लॉकडाउनच्या चारही टप्प्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...
Read More
post-image
ट्रेंडिंग देश महाराष्ट्र

‘या’ विशाल चिखलात लपलेला जीव तुम्ही शोधू शकता का?

जगावर कोसळलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी शेकडो देश लॉकडाऊन असल्याने सध्या करोडो नागरिक आपापल्या घरातच आहेत. भारतातही मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More