कोरोनाच्या धास्तीने गावची ओढ, ट्रकमध्ये ३०० कामगार आढळले – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

कोरोनाच्या धास्तीने गावची ओढ, ट्रकमध्ये ३०० कामगार आढळले

यवतमाळ – लॉकडाऊनमुळे सार्वजनिक आणि खासगी वाहतूक ठप्प झाल्याने परगावाहून आलेल्या लोकांना आपल्या मुळगावी परतणं कठीण होऊन बसलंय. या कामगारांना त्यांच्या मुळगावी घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला अडवण्यात आलं आहे. दोन ट्रक ताब्यात घेण्यात आले असून या दोन्ही ट्रकमध्ये दाटीवाटीने ३०० कामगार बसले होते.
हे कामगार राजस्थान येथील आहेत. कोरोना व्हायरसमुळे यांचा रोजगार ठप्प झालाय. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुळगावी परतायचं होतं. मात्र वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने गावी जाण्याचे मार्ग उपलब्ध नव्हते. म्हणून या कामगारांनी चक्क ट्रकचा आधार घेतला. तेलंगणा ते राजस्थानदरम्यान जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणारा हा ट्रक असून या ट्रकमधून चक्क ३०० कामगार प्रवास करत होते.
तेलंगणाहून राजस्थानला जाणारे हे दोन ट्रक पोलिसांच्या पथकाने यवतमाळ येथे अडवले. हे ट्रक जीवनाश्यक वस्तूंची ने-आण करत होते. त्यामु‌ळे त्यांना कुठे अडवण्यात आलं नाही. मात्र यवतमाळ पोलिसांनी या ट्रकची तपासणी केली असता त्यांना त्यात ३०० कामगार आढळले.
पांढरकवडा टोलवर ट्रकचालकाला ट्रक कुठे चाललाय असा प्रश्न विचारला असता त्याला योग्य उत्तर देता आलं नाही. तसेच, या ट्रकमध्ये काय आहे, याचंही उत्तर ट्रक चालकानं दिलं नाही. म्हणून पोलिसांनी ट्रकची तपासणी केली.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३५वर! आरोग्यमंत्र्यांची माहिती

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More