विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात पकडलं, महाराष्ट्र एटीएसची कामगिरी – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात पकडलं, महाराष्ट्र एटीएसची कामगिरी

मुंबई – उत्तर प्रदेशातील आठ पोलीस हत्याकांडातील दोन आरोपींना ठाण्यातील कोलशेत येथून अटक करण्यात आली आहे. हे दोघेही विकास दुबेचे साथीदार होते. दरम्यान, या हत्याकांडातील आणखी किमान १० आरोपी फरार असून उत्तर प्रदेश पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

वाचा – विकास दुबेच्या एन्काऊन्टरनंतर त्याच्या पत्नीने दिली तीव्र प्रतिक्रिया, म्हणाली….

विकास दुबेचा काल एन्काऊन्टर केल्यानंतर पोलीस त्याच्यासाथीदारांच्या शोधात होते. त्यामुळे हाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (महाराष्ट्र एटीएस)  उत्तर प्रदेश पोलिसांना सहकार्य केलं असून त्यांनीच या दोन आरोपींचा छडा लावला आहे. आज पत्रकार परीषद घेत ही माहिती देण्यात आली. आतापर्यंत विकास दुबेसह टोळीतील ६ गुडांना एन्काऊन्टरमध्ये मारण्यात आलं आहे. आज पकडण्यात आलेल्या आरोपींची अरविंद ऊर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी आणि सुशीलकुमार ऊर्फ सोनू सुरेश तिवारी अशी नावं आहेत.

ठाण्यातून पकडण्यात आलेल्या आरोपींविषयी पोलिसांनी सांगितले की, ‘विकास दुबे या गुंडाला अटक करण्यासाठी पोलीस गेले असता त्याच्या साथीदारांनी केलेल्या गोळीबारात ८ पोलिसांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडातील अनेक आरोपी फरार असून त्यातील एक आरोपी ठाण्यात लपला असल्याची खात्रीशीर माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला होता. या सापळ्यात अरविंद ऊर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी हा आरोपी अलगद अडकला. त्याला व त्याचा वाहनचालक सुशिलकुमार ऊर्फ सोनू सुरेश तिवारी या दोघांना ठाण्यातील कोलशेत येथून अटक करण्यात आली आहे. याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांना कळवण्यात आले आहे,’ असे विक्रम देशमाने यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यात देशाला हादरवणारं हे हत्याकांड घडलं होतं. दुबे गँगच्या हल्ल्यात ८ पोलीस शहीद झाले होते. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी दुबे गँगविरुद्ध धडक कारवाई सुरू केली असून विकास दुबे शुक्रवारी पोलीस चकमकीत मारला गेला आहे. पोलीस हत्याकांड प्रकरणी अरविंद ऊर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी आणि त्याचा ड्रायव्हर सुशिलकुमार ऊर्फ सोनू सुरेश तिवारी हे दोघे वॉन्टेड होते. त्यांना अटक करण्यात आल्याने दुबेचे अनेक कारनामे उघड होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री संतोष शुक्ला यांची २००१ मध्ये हत्या झाली होती. त्याप्रकरणातही हे दोघे वॉन्टेड होते, असे पोलिसांनी सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश विदेश

गुड न्यूज! भारतात २०२१ साली विश्वचषक होणार

मुंबई – भारतामध्ये होणारा विश्वचषक वेळेनुसार २०२१ साली होणार आहे. आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. आयसीसीने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील ट्वेन्टी-२० विश्वचषक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

आज राज्यात 10 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद, तर 300 मृत्यू

मुंबई – राज्यात आज 10 हजार 483 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 90 हजार 262 वर पोहोचला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप, भरारी पथके नेमण्याचे आदेश

मुंबई – राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत २३९  नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज २३९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून ३२७  जणांना गेल्या २४...
Read More
post-image
मुंबई

९८ वर्षांच्या आजोबांनी १९ दिवसांत केली कोरोनावर मात

मुंबई – देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आहेत. देशात ६० वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे कोरोनामुळे सर्वाधिक...
Read More