आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण – eNavakal
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार. अर्थात ते सर्वांच्या सुरक्षितेसाठीच आहे. पण तुम्हाला माहितीय एका दाम्पत्याने लॉकडाउन असतानाही चक्क ४२.२ कोलिमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली आहे. काय? ४२ किमी, कसं शक्य आहे? त्यांनी लॉकडाउनचा नियम मोडला का? असे अनेक प्रश्न निश्चितच तुम्हाला पडले असतील. पण तुम्हाला आणखी एक आश्चर्य वाटेल कि,  त्यांनी घरी राहूनच हि ४२.२ किमीची मॅरेथॉन पूर्ण केली आहे. सध्या सोशल मीडियावर या दाम्पत्यांचा बोलबाला आहे. चला तर जाणून घेऊ नेमकी हि भानगड आहे तरी काय?

#Balcony marathon 

संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहत असलेल्या ४१ वर्षांचा कोलिन एलन आणि त्याची पत्नी हिल्डा या दोघांनी हा उपक्रम केला आहे. दुबईतील आपल्या फ्लॅटमधील २० मीटरच्या बाल्कनीत त्यांनी ४२ किमीची मॅरेथॉन पूर्ण केली आहे. यासाठी त्यांनी आपल्या बाल्कनीत चक्क २१०० फेऱ्या मारल्या. त्यांच्या या फिटनेस फंड्याचं कौतुक त्यांच्या आसपासच्या शेजाऱ्यांनी केलं आहे. इतकंच काय तर सोशल मीडियावर देखील या दाम्पत्याचं कौतुक केलं जात आहे. कोलिन याने आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून आपल्या या मॅरेथॉनची माहिती देत #Balconymarathon हा हॅशटॅगही ट्रेंड केला होता.

दाम्पत्याच्या मुलीची महत्त्वाची कामगिरी 

 

View this post on Instagram

 

Race Organizer , Geena has been very kind to make some signs for us for the day… Good to know where to start and turn around.. Athletes responsibility to know the course so I’m down on course now making sure I know where to go.. 40min till start of our #balconymarathon with @karoodaisy … #fortheloveofsport #oneobsession #GRID #globalrunningindoors . . . . . . #triathlon #triathlete #triathlontraining #triathletesrock #doyouevencustombro #aeroiseverything #shutupandride #cycling #timetrial #bikesofinstagram #triathletesofinsta #triathlonlife #triathleteslife #travelholic #travelgram #travelblogger #traveller #outsideisfree #bloggerstyle #bloggerlife #triathlonmotivation #roadcyclist #roadcycling #mydubai #dubaifitness

A post shared by Collin Allin (@collinallin) on

या दाम्पत्याची मॅरेथॉन यशस्वी करण्यात त्यांच्या १० वर्षांच्या मुलीची देखील महत्त्वाची कामगीरी आहे. तिने रेस डायरेक्टरची भूमिका बजावत स्टार्ट आणि फिनिश लाईनची चिन्ह तयार केली होती. तसंच आई वडिलांचं मनोबल वाढवण्यासाठी तिने संगीतही वाजवलं होतं. कोलिन याने या मॅरेथॉनचं लाईव्ह प्रक्षेपण केल्याने त्याला अनेकांची दाद मिळाली. ५ तास, ९ मिनिटं आणि ३९ सेकंदात त्यांनी ४२.२ किमीची मॅरेथॉन पूर्ण केली. या मॅरेथॉनचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे लोकांनी घरी राहूनच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. म्हणूनच लॉकडाउनमध्येही ४२.२ किमीची मॅरेथॉन पूर्ण करणारं हे दाम्पत्य कौतुकास पात्र ठरत आहेत.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लॉकडाउन 4.0 : आता पुढे काय करणार? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली – देशात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. लॉकडाउनच्या चारही टप्प्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...
Read More
post-image
ट्रेंडिंग देश महाराष्ट्र

‘या’ विशाल चिखलात लपलेला जीव तुम्ही शोधू शकता का?

जगावर कोसळलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी शेकडो देश लॉकडाऊन असल्याने सध्या करोडो नागरिक आपापल्या घरातच आहेत. भारतातही मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More