(Live) #Elections2019 दुपारी १ वाजेपर्यंत ३९.८५ टक्के मतदान – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

(Live) #Elections2019 दुपारी १ वाजेपर्यंत ३९.८५ टक्के मतदान

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज ५९ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. आज 8 राज्यांमध्ये 59 जागांवर मतदान होणार आहे. त्यानंतर 23 मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. शेवटच्या सातव्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुखवीरसिंह बादल, शत्रुघ्न सिन्हा, अनुराग ठाकूर, माजी मुख्यमंत्री शिबु सोरेन यांच्या भाग्याचा फैसला मतपेटीत बंद होणार आहे.

या 59 जागांपैकी पंजाबच्या सर्वच्या सर्व 13 व हिमाचल प्रदेशच्या सर्व 4 जागा व चंदिगड या केंद्रशासित प्रदेशात एका जागेवर रविवारी मतदान होणार आहे. बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व पश्‍चिम बंगाल या राज्यांतील काही जागांवर मतदान होणार आहे. बिहारमधील सासाराम, नालंदा, पाटणा साहीब, पाटलीपुत्र, आरा, बक्सर अशा सात जागांवर, झारखंडच्या 3 जागा, मध्य प्रदेशातील 8 जागा, उत्तर प्रदेशातील 13 जागा, पश्‍चिम बंगालमधील 9 जागांवर मतदान होणार आहे. पाटणा साहीबमधून शत्रुघ्न सिन्हा व रविशंकर यांच्यात अटीतटीची लढत आहे. तर सासाराममध्ये मीराकुमार यांच्या वारशाची कसोटी आहे. पंजाबमध्ये अकाली दल व काँग्रेस यांच्यात टक्‍कर आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रविवारी मतदान होणार आहे.

(Live) अपडेट


देशभरात दुपारी १ वाजेपर्यंत ३९.८५ टक्के मतदान

बिहार ३६.२० टक्के, हिमाचल प्रदेश ३४.४७ टक्के, मध्यप्रदेश ४३.८९ टक्के, पंजाब ३६.६६ टक्के, उत्तर प्रदेश ३६.३७ टक्के, पश्चिम बंगाल ४७.५५ टक्के, झारखंड ५२.८९ टक्के, चंदीगड ३५.६० टक्के.


‘फ्लाईंग शिख’ धावपटू मिल्खा सिंग यांनी बजावला मतदानाचा हक्क


देशभरात दुपारी १२ वाजेपर्यंत  २५.४७ टक्के मतदान

बिहार – 18.90 टक्के, हिमाचल प्रदेश – 27.62, टक्के मध्य प्रदेश – 29.48 टक्के, पंजाब – 23.45 टक्के, उत्तर प्रदेश – 23.16 टक्के, पश्चिम बंगाल – 32.15 टक्के, झारखंड – 31.39 टक्के, चंदीगड – 22.30 टक्के


पश्चिम बंगाल – पश्चिम बंगालमध्ये मतदारांची केंद्राबाहेर निदर्शनं, बसीरहाट येथील मतदान केंद्रांवर तृणमूलचे कार्यकर्ते मतदान करण्यापासून रोखत असल्याचा आरोप


पाटणा – तेजप्रताप यादव यांच्या गाडीवर हल्ला; संतप्त कॅमेरामॅननं गाडीची काच फोडली


पश्चिम बंगाल – मतदानादरम्यान हिंसा, भाजप कार्यकर्त्यांकडून बसंती महामार्गावर रास्ता रोको


देशभरात सकाळी ११ वाजेपर्यंत  16.96 टक्के मतदान

बिहार – 17.94 टक्के, हिमाचल प्रदेश – 15.66 टक्के, मध्य प्रदेश – 16.28 टक्के, पंजाब – 15.65 टक्के, उत्तर प्रदेश – 14.43 टक्के, पश्चिम बंगाल – 21.11 टक्के, झारखंड – 23.86 टक्के, चंदीगड- 10.40 टक्के


103 वर्षीय आजीने बजावला मतदानाचा हक्क


पंजाब – काँग्रेसचे चंदीगडमधील उमेदवार पवन कुमार बंसल यांनी बजावला मतदानाचा हक्क


पश्चिम बंगालमध्ये मथुरापूरमधील रायडिगी परिसरात बॉम्बस्फोट, पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदान सुरु असताना स्फोट, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, सुदैवाने या बॉम्बस्फोटात जीवितहानी झालेली नाही


पश्चिम बंगाल कोलकात्यात टीएमसीच्या उमेदवाराला मतदान केंद्राबाहेर रोखलं


देशभरात सकाळी ९ वाजेपर्यंत मतदान

बिहार – १०.६५ टक्के, हिमाचल प्रदेश – ०.८७ टक्के, मध्यप्रदेश – ७.१६ टक्के, पंजाब – ४.६४ टक्के, उत्तर प्रदेश – ५.९७ टक्के, पश्चिम बंगाल – १०.५४ टक्के, झारखंड – १३.१९ टक्के आणि चंदीगड – १०.४० टक्के


क्रिकेटपटू हरभजन सिंह मतदानासाठी रांगेत उभा


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले मतदान


गोरखपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बजावला मतदानाचा हक्क


बिहार, चंडीगड , हिमाचल प्रदेश , झारखंड, मध्य प्रदेश , पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये आज मतदान


देशात अखेरच्या टप्प्यासाठी ५९ जागांवर मतदानाला सुरुवात

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More