Live : आमच्या पायलटला आमच्याकडे परत पाठवा – भारत – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

Live : आमच्या पायलटला आमच्याकडे परत पाठवा – भारत

श्रीनगर – भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर आता पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. गस्त घालत असलेल्या भारतीय हवाई दलाच्या जेट विमानांनी पाकच्या विमानांना हुसकावून लावले. पाकिस्तानच्या तीन विमानांपैकी एफ-१६ या विमानाला पाडण्यात भारताला यश आलेय.

आज साडे आकाराच्या सुमारास पाकिस्तानच्या तीन विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. राजौरीत पाककडून हवाई सीमारेषेचे उल्लंघन करण्यात आले आहे. मात्र गस्त घालत असलेल्या भारतीय हवाई दलाच्या जेट विमानांनी पाकच्या विमानांना हुककावून लावल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. परत पळून जात असताना पुंछ आणि राजौतीत परिसरात पाकिस्तानी विमानातून बॉम्ब फेकले असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर लेह, जम्मू आणि पठाणकोट मध्ये एअरपोर्टवर हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. श्रीनगर विमानतळ पुढील तीन तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व प्रवसी विमाने थांबविण्यात आली आहेत.

LIVE  अपडेट 

१९:०५ आमच्या पायलटला परत पाठवा – भारताची पाकिस्तानकडे मागणी 

आमच्या पायलटला परत पाठवा अशी अधिकृत मागणी भारताकडून पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांकडे करण्यात आली आहे.

१८:४८ पाकिस्तानचे २ नव्हे एकच वैमानिक आमच्या ताब्यात – पाकिस्तानची पलटी 

१५:५५ आम्ही भारताला फक्त आमची ताकद दाखवली – इम्रान खान 

भारताचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेतली असून आम्हाला युद्ध करायचे नसून चर्चेनेही प्रश्न सुटू शकतात, असे ते म्हणाले. तसेच पहिल्या महायुद्धापासूनचे संदर्भ देत आतापर्यंतच्या युद्धात शेवट कोणाला कळला नाही, असे त्यांनी सांगितले. तुमच्याकडे असलेली शस्त्रे आमच्याकडेही आहेत असे म्हणून त्यांनी भारताला धमकी दिली आहे.

१५:२४ भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद 

भारताने मिग २१ हे लढाऊ विमान गमावले असून त्यातील वैमानिक अभिनंदन बेपत्ता आहेत, ते आपल्याकडे असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. मात्र याविषयी भारताकडून तपास सुरू आहे, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

१४:५५ भारतीय वायुदलाचे वैमानिक अभिनंदन अद्याप बेपत्ता 

भारतीय वायुसेनेचे वैमानिक अभिनंदन अद्याप बेपत्ता आहेत. ते मिग २१ जेट उडवत होते. अजूनही ते परतलेले नाहीत.

१४:४१ श्रीनगर, शिमलासह आठ विमानतळ तीन महिन्यासाठी बंद

देशातील महत्वाची आठ विमानतळ पुढील तीन महिन्यांसह बंद राहणार आहेत. अमृतसर, पठाणकोट, श्रीनगर, जम्मू, लेह, शिमला, धर्मशाला विमानतळ २७ मे पर्यंत बंद राहणार आहेत. एकही विनामाला उडण्याची परवनगी नसल्याची माहिती समोर येत आहे.

१३:35 – चंदीगढ, जम्मू, पठाणकोट, शिमला, धर्मशाला, अमृतसर, श्रीनगर, लेह विमानतळ वाहतुकीस बंद, प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणस्तव विमानतळ बंद ठेवण्यात आली आहेत.

१३:35 पाकिस्तानमधील विमानतळे बंद

लाहोर, मुल्तान, फैसलाबाद, सियालकोट, इस्लामाबाद विमानतळावरुन होणारी विमान वाहतूक थांबवली

१३:२३ नवी दिल्ली -लादेनला मारलं जात तर काहीही शक्य आहे – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे विधान

१३:२१  – २७०० कोटींच्या शस्त्र खरेदीला तातडीची मंजुरी

नवी दिल्लीत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान संरक्षण साहित्य खरेदीला मंजूरी देण्यात आली. दिल्लीत केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

१२:५० – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेण्यात येत असून भारत पाक संबंधांवर या बैठकीत चर्चा सुरू आहे.

12:४३ – पाकिस्तानकडूनही विमान वाहतूक बंद 

जम्मू काश्मीरच्या सर्व विमानतळांवर हाय अलर्ट देण्यात आला असून पाकिस्तानकडूनही विमान वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पाकिस्तानने आपली ५ विमानतळे बंद ठेवली आहेत.

१२:०९  – भारताने पाकिस्तानचं एफ-१६ विमान पाडलं 

भारताने पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले आहे. नौशेरातील लं खोऱ्यामध्ये पाकिस्तानी विमान पाडण्यात आले.

11:46 – गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, ‘रॉ’चे प्रमुख आणि गृहसचिवांसोबत बैठक बोलावली

११:४४   लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळ हाय अलर्टवर

पाकच्या विमानांनी घुसखोरी केल्यानंतर श्रीनगर, लेह आणि पठाणकोट विमानतळांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या तिन्ही विमानतळांवरील विमान सेवा बंद करण्यात आली आहे.

११:३४  पाकिस्तानच्या ३ विमानांची भारतीय हद्दीत घुसखोरी

आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करत पाकिस्तानी लष्कराचे लढाऊ विमानें भारताच्या हद्दीत घुसल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. मात्र भारतीय हवाई दलाने या विमानांना चोख प्रत्युत्तर देत तत्काळ पिटाळून लावल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा

भारताची सुवर्णकन्या धावपटू पी. टी. उषा यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म. २७ जून १९६४ रोजी केरळ मधील कुथ्थाली या गावी झाला. पी.टी. उषा हे भारतीय...
Read More
post-image
मनोरंजन

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने काल आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी बॉलिवूडकडून तंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर याच खास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत.यापैकी बहुतांश तेलंगणाचे रहिवासी आहेत. या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More